आंदोलन कर पण तिकीट दाखव; विनातिकीट ST कर्मचाऱ्यांना CSMT स्थानकावरुन बाहेर काढलं

ST Workers Protest: ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनीच थांबावं आणि ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांनी बाहेर निघावं किंवा तिकीट काढावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं.
without ticket st protesters employees were evacuated from the CSMT station
without ticket st protesters employees were evacuated from the CSMT stationSaam Tv

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरासमोर एकत्र येत अतिशय तीव्र आंदोलन केले होते. विलीनाकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने निर्णय दिला असतानाही कर्मचारी अतिशय आक्रमक झाले होते. त्यानंतर हे आंदोलक मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) बसले होते, तिथून पोलिसांनी हटकल्यानंतर या एसटी कर्मचाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) या रेल्वे स्थानकावर ठिय्या मांडला. मात्र यावेळी रेल्वे प्रशासनाने एसटी कर्माचाऱ्यांची तिकीट (Ticket) तपासणी सुरु केली आणि विनातिकीट आंदोलकांना प्लॅटफॉर्मवरुन हटण्यात आले.

हे देखील पहा -

मध्य रेल्वेच्या प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) सुरुवातील विनम्रपणे आवाहन केलं की, रेल्वे स्थानक हे आंदोलनाचं स्थळ नाही. मात्र प्लॅटफॉर्मवर गर्दी होत असल्यानं रेल्वे प्रशासनानं एसटी आंदोलकांकडे प्लॅटफॉर्म तिकीटाची विचारणा केली. ज्यांच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट नाही अशांना बाहेर काढण्यात आलं. ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनीच थांबावं आणि ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांनी बाहेर निघावं किंवा तिकीट काढावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं.

यानंतर एसटी कर्मचारी आंदोलनकर्ते आक्रमक झाले, तिकीट काढायला पैसे नाहीत असं म्हणत इथून उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर रेल्वे पोलिसांचीही गनिमीकावा करत एक-एक कर्मचाऱ्याल बाहेर काढलं. यावेळी विनातिकीट बसू नये असं लोकांना आवाहन करत ज्यांच्याकडे तिकीट आहे ते थांबतील आणि त्यांना सन्मानाने ट्रेन ने प्रवास करत येईल असं रेल्वे पोलिस प्रशासनानं आवाहन केलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल, गुरुवारी सुनावणी होऊन, त्याबाबत निकाल देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही, असं परब यांनी सांगितलं होतं.

without ticket st protesters employees were evacuated from the CSMT station
ST Workers Protest: तुमचीही घरं काचेची आहे हे लक्षात ठेवा; भाजपचं नाव न घेता राऊतांचा टोला

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधांतरी राहिला होता. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com