Remember that your house is made of glass; sanjay raut slams without mentioning BJP's name
Remember that your house is made of glass; sanjay raut slams without mentioning BJP's nameSaam TV

ST Workers Protest: तुमचीही घरं काचेची आहे हे लक्षात ठेवा; भाजपचं नाव न घेता राऊतांचा टोला

Sanjay Raut Latest News: एक राजकीय पक्ष त्यांना विशेष ताकद देतोय, हे ठिक नाही. तुम्हीही काचेच्या घरात राहतात हे लक्षात ठेवा असा इशारा राऊतांनी दिला आहे.

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरासमोर एकत्र येत अतिशय तीव्र आंदोलन केले होते. विलीनाकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने निर्णय दिला असतानाही कर्मचारी (ST Workers) अतिशय आक्रमक झाले होते. याबाबत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचं नाव न घेता भाजपला (BJP) टोला लगावला आहे. काही लोग अचानक नेते झाले आहेत आणि एक राजकीय पक्ष त्यांना विशेष ताकद देतोय, हे ठिक नाही. तुम्हीही काचेच्या घरात राहतात हे लक्षात ठेवा असा इशारा राऊतांनी दिला आहे. (Remember that your house is made of glass; sanjay raut slams without mentioning BJP's name)

हे देखील पहा -

राऊत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या महाराष्ट्र सरकारने पुर्ण केल्या आहेत. तरीही एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण कुणीतरी बिघडवण्याचं काम करतंय. याच्यामागचे खरे सुत्रधार कोण आहेत ते राज्य सरकार शोधून त्यांना हाणून पाडेल. शरद पवार राज्याचेच नाही तर देशातले मान्यवर नेते आहेत, त्यांच्या घरासमोर जाऊन असं कृत्य करणं ही आपली संस्कृती आणि संस्कार नाही. पण, काही लोग अचानक नेते झाले आहेत असं म्हणत त्यांनी वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आणि एक राजकीय पक्ष त्यांना विशेष ताकद देतोय, हे ठिक नाही. तुम्हीही काचेच्या घरात राहतात हे लक्षात ठेवा असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली.

Remember that your house is made of glass; sanjay raut slams without mentioning BJP's name
Vijay Wadettiwar: सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं, त्यांच्यावर कारवाईसाठी आमच्या सरकारचा विलंब झाला - वडेट्टीवार

पुढे राऊत म्हणाले की, राज्यात असं कधीच झालं नाही, आम्ही असो किंवा तुम्ही असं होऊ नये. तुम्ही राक्षस पाळला आहे, जे पेरेल तेच उगवेल, कायदा सर्वांना वठणीवर आणेल असंही राऊत म्हणाले. तसेच किरीट सोमय्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, सोमय्या अंडरग्राऊंड झाले आहेत. ते प्रश्नांपासून वाचण्यासाठी लपत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे फोन टॅपिंग प्रकरणात ते आज स्टेटमेंट नोंदवणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com