Somaiya's Rs 100 crore toilet scam to be exposed soon said Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

सोमय्यांचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार: संजय राऊत

100Cr Toilet Scam News: मीरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा घोटाळा बाहेर काढणार आहे असं राऊत म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असा गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी न्यायव्यस्थेवरही टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. राऊत (Sanjay Raut ) म्हणाले की, विक्रांतच्या घोटाळ्यानंतर मी आता टॉयलेट घोटाळा (Toilet Scam) बाहेर काढणार आहे. मीरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा घोटाळा बाहेर काढणार आहे असं राऊत म्हणाले. (Somaiya's Rs 100 crore toilet scam to be exposed soon said Sanjay Raut)

हे देखील पहा -

पुढे राऊत म्हणाले की, युवा प्रतिष्ठान एनजीओच्या नावानं सोमय्या (Kirit Somaiya) परिवारानं घोटाळा केला. यावर फडणवीसांनी बोलायला हवं, ट्विट करायला हवं. फडणवीसांची राष्ट्रभक्ती उचांबळून येते. पवारांवर बोलले तर विक्रांत घोटाळ्यावरही बोला, आम्ही जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्या असं आवाहन त्यांनी फडणवीसांना केलं आहे.

मी भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याबद्दल एक बातमी वाचली ज्यात ते म्हणाले की, ज्या गोष्टी आम्ही पोलिसांकडून करुन घेऊ शकत नाही ते आम्ही न्यायालयाकडून करुन घेतो. यावर राऊत म्हणाले, भाजपच्या सगळ्या नेत्यांना सलग दिलासे कसे मिळतात. न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे का. भाजपला दिलासे देण्यासाठी न्यायव्यवस्थेत तसे लोक बसवण्यात आले आहे का? असं असेल तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं राऊत म्हणाले.

विक्रांत प्रकरणी राजभवनाने आम्हाला लिहूव दिलंय की, आमच्याकडे असं कोणतंच खातं नाही, त्यामुळे पुरावे कसले मागतातय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच सरकार पडणार नाही आणि किमान पुढचे २५ वर्षे भाजप सत्तेत येणार नाही असा दावा त्यांनी केला. तसेच आयएनएस घोटाळ्याचं उत्तर द्या असं ते भाजपला म्हणाले. न्यायव्यवस्थेने जरी डोळ्याला पट्टी बांधली तरी त्या पट्टीला छिद्र पडलंय आणि त्या छिद्रातून ती आपल्या लोकांकडे पाहते असं म्हणत त्यांनी न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT