अहमदनगर: वडिलांनी मुलीला दिलेला मोबाईल सारखा घेऊन बसते त्यामध्ये नेहमी व्यस्त असते, अभ्यासाकडे लक्ष दे असं म्हणत वडिलांनी मुलीची कानउघडणी केली. मात्र हे सहन न झाल्याने पंधरा वर्षे अल्पवयीन (A Minor Girl) विद्यार्थिनीने जवळच असलेल्या मुळा नदी पात्रामध्ये रात्रीच्या वेळी पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगाव येथे घडली आहे. (mobile addicted minor girl commits suicide because her father shouts her to study)
हे देखील पहा -
अक्षदा वाघ वय 15 वर्ष असं मृत झालेल्या मुलीचं नाव असून ती इयत्ता 9 मध्ये शिक्षण घेत होती. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने वडील मोलमजुरी करतात त्यातूनच पैसे साठवून कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला. त्याच मोबाईलवर (Mobile) मुलगी सतत व्यस्त दिसू लागल्याने वडील रागवले. याचा राग मनात धरून रात्री ती अकराच्या दरम्यान कोणालाही न सांगता ती घराबाहेर पडली. परिसरात रात्रभर नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. सकाळी काही नागरिकांना मुळा नदी पात्रात पाण्यामध्ये मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनास्थळी घारगाव पोलीस दाखल होत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.