Sidhu Moose Wala, Santosh Jadhav
Sidhu Moose Wala, Santosh Jadhav Saam Tv
मुंबई/पुणे

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण; आरोपी संतोष जाधवचा पोलीस चौकशीत मोठा खुलासा!

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपी संतोष जाधव (Santosh Jadhav) याला अटक केली आहे. आता पोलीस संतोष जाधव याची कसून चौकशी करत आहे. दरम्यान, मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव याने पोलीस चौकशीत (Pune Police) मोठा खुलासा केला आहे. मुसेवाला प्रकरणात आपला सहभाग नसल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तपास यंत्रणा मोठा झटका बसला आहे. (Sidhu Moose Wala Murder Case Latest News Santosh Jadhav)

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. भर दिवसात जीपमधून जात असताना बंदुकीने गोळ्या घालून मुसेवालाचा खून करण्यात आला होता. हल्ल्यानंतर मुसेवाला त्यांच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर ज्या 8 जणांनी गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोघेजण पुण्यातील असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती.

मुसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण 8 शूटर वापरण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबचे, तीन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते, असं सांगण्यात आलं. दरम्यान, पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोघांनाही अटक केली. आता त्यांची कसून चौकशी पोलीस करत आहेत. मात्र, या चौकशीतहत्येच्या दिवशी आपण गुजरातमध्ये असल्याची माहिती संतोष जाधव याने चौकशीत सांगितल्याचे साम टिव्हीला खास सूत्रांनी सांगितले आहे.

यापूर्वी देखील सौरभ महाकाळ याने मुसेवाला हत्या प्रकारणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, संतोष जाधवच्या गुन्ह्यांबाबतची चौकशी करण्यासाठी पुण्याचे पथक गुजरात आणि मध्य प्रदेश येथे गेल्याची माहिती आहे. मात्र, संतोष जाधव याने मी या प्रकरणात सहभागी नव्हतो. हत्येच्या दिवशी गुजरातमध्ये होतो असे तपासात म्हटल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT