Sidhu Moose Wala, Santosh Jadhav Saam Tv
मुंबई/पुणे

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण; शार्प शूटर संतोष जाधव पुणे पोलिसांच्या ताब्यात

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील आरोपी संतोष याचं नाव घेण्यात आलं

रोहिदास गाडगे

पुणे : सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या. गुजरात (Gujrat) राज्यातील कच्छ मधून आरोपी संतोष याला अटक करण्यात आली आहे. संतोष सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही रात्री 12 वाजता न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं असता त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Sidhu Moose Wala Murder Case Latest News)

संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता.

मात्र संतोष जाधवची चर्चा तेव्हापासून सुरु झाली जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात त्याच नावं घेण्यात आलं. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील त्याचं नाव घेण्यात आलं. त्यामुळे पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला.

त्यासाठी या वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधुन त्याला अटक करण्यात यश मिळवलं आहे. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.

संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. संतोष जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT