Pune: श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना मुसंडी मारणार? Saam TV
मुंबई/पुणे

Pune: श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना मुसंडी मारणार?

सर्वसामान्य देहूमधील (Dehu) नागरिकांना ग्रामपंचायत मधून नगरपंचायत झाल्यानंतर उमेदवारांकडून अनेक अपेक्षा वाढल्या आहेत.

दिलीप कांबळे

पुणे : श्रीक्षेत्र देहूच्या ग्रामपंचायतीच रूपांतर होऊन नगरपंचायत झाली. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या देहूमध्ये देखील अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने कचरा समस्या, रस्ते, पाणी या आहेत. या नगरपंचायतच्या या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये काटे की टक्कर पहायला मिळत असली तरी उद्धव ठाकरे यांच्या कामाचा वसा घेऊन शिवसेना देखील देहू नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे शिवसेना देखील मुसंडी मारू शकत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. 

सर्वसामान्य देहूमधील (Dehu) नागरिकांना ग्रामपंचायत मधून नगरपंचायत झाल्यानंतर उमेदवारांकडून अनेक अपेक्षा वाढल्या आहेत. त्यात नागरिकांची मत जाणून घेतल्यानंतर त्यांना सुशिक्षित, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा उमेदवार पाहिजे असल्याचे निदर्शनास आले. तर महिलांच्या अपेक्षा ह्या गृहउद्योग आणि हाताला काम देणारा उमेदवार पाहिजे असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. 

भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीत काटे की टक्कर असली तरी शिवसेना (Shivsena) देखील स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी सरसावली आहे. शिवसेना संपर्क प्रमूख सचिन अहिर, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, तसेच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे देहू नगरीत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपच्या कोणत्याच बड्या नेत्यांच्या सभा किंवा रॅली झाली नसली तरी शिवसेनेने मात्र प्रचार सभा आणि रॅली साठी बडे नेते आणले आहे.

त्यामुळे त्याच्या प्रभावामुळे का होईना शिवसेना चांगल्या जागा मिळवून देहू नगरपंचायतींवर भगवा फडकवेल अशी आशा शिवसैनिकांना आहे. दरम्यान आजी माजी आमदार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली आहे. त्यामुळे जय शिवाजी जय भवानी चा गजर देहूतुन दुंमदुंमणार यात काहीच शंका नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Dnyanada Ramtirthkar : लगीन घटिका समीप आली! ज्ञानदाचा होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिला PHOTO; थाटात पार पडला साखरपुडा

Rava Kesari Recipe: साऊथ इंडियन स्टाईल रवा केसरी हलवा कसा बनवायचा?

Street style sev puri chutney: शेवपुरीची स्ट्रीट स्टाईल चटपटीत आंबट गोड चटणी घरच्या घरी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ४० लाख लाडक्या बहिणींचा अपात्र होणार? ₹१५०० कायमचे बंद; तुमचं नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT