sai baba  saam tv
मुंबई/पुणे

Shri Sai Baba : साईबाबा मूर्तीची नेमकी कहाणी काय? जाणून घ्या विलक्षण कथा

१९९८ साली साई बाबांनी महासमाधी घेतल्यानंतर ३६ वर्षांनी या मूर्तीची समाधी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली.

अभिजीत सोनावणे

Shri Sai Baba story : आजच्या दिवशी ७ ऑक्टोबर १९५४ साली शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आज मूर्ती पाहतो. त्या साईंच्या मूर्तीची (Sai Baba) प्रतिष्ठापना करण्यात आली. आज या साईबाबांच्या मूर्तीला ६८ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे केवळ शिर्डी संस्थानच्या नव्हे तर भाविकांसाठी आजच्या दिवसाला खूप महत्व आहे. १९९८ साली साई बाबांनी महासमाधी घेतल्यानंतर ३६ वर्षांनी या मूर्तीची समाधी मंदिरात (Temple) प्रतिष्ठापना करण्यात आली.

जाणून घ्या साई बाबांच्या मूर्तीची विलक्षण कथा ?

१९५२ साली कलशारोहणाने साई समाधीला मंदिराचे स्वरूप आल्यानंतर तत्कालीन विश्वस्त मंडळाने साईंची पूर्णाकृती मूर्ती समाधी मंदिरात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबईचे ख्यातनाम मूर्तिकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांना हे काम सोपवण्यात आलं. त्यांनी प्रथम बाबांची शाडूची मूर्ती तयार केली. ती पसंतीस आल्यानंतर आज ही मूर्ती आपण पाहतोय, ती बाळाजी तालीम यांनी साकारली.

साईंची ही मूर्ती इटालियन मार्बलची आहे. हा मार्बल करारा मार्बल नावाने ओळखला जातो. मुंबई बंदरात बेवारस पडलेला हा मार्बल साई संस्थानने लिलावात घेतला. यापासून बनवलेली साई बाबांची मूर्ती साडे पाच फूट उंच आहे. ती सव्वा तीन फूट लांब आणि अडीच फूट रुंद चौथऱ्यावर आहे. या मूर्तीला तयार करण्यास २२ हजार रुपये खर्च आणि ७ महिन्यांचा अवधी लागला.

मुंबईतील गिरगावातील तालीम आर्ट स्टुडिओ मध्ये ही मूर्ती बनवण्यात आली. तालीम ही मूर्ती घडवत असताना ती इतकी हुबेहूब व सुबक घडली जात होती, की तिच्या दर्शनासाठी लोक स्टुडिओत गर्दी करू लागले. रात्री दहा बाजेपर्यंत गर्दी असायची व नारळ, फुले, पेढे यांचा ढीग जमत असे. स्टुडिओचे मंदिरात रूपांतर झाले होते.

मूर्ती सुबक झाली तरी तालीमांना समाधान नव्हते. बाबांचे नाक, डोळे कसे होते या बारकाव्यांबाबत त्यांना तळमळ लागली होती. अशा व्याकूळ अवस्थेतच त्यांना एका पहाटे स्टुडिओत आल्यावर या तयार केलेल्या पुतळ्याजवळ बाबांनी साक्षात क्षणभर दर्शन दिले. त्यामुळे त्यांचे डोळे दिपले. या घटनेनंतर त्यांना बाबांबद्दलचे सूक्ष्म ज्ञान अवगत झाले व साईंची अजरामर व संजीवन मुर्ती निर्माण झाली.

प्राणप्रतिष्ठा

साई बाबांची मूर्ती एका मालवाहू मोटारीतून शनिवार, २ ऑक्टोबर, १९५४ रोजी शिर्डीस आणण्यात आली. मालमोटार खंडोबाच्या देवळापाशी पोहचल्यानंतर तेथून मिरवणुकीने व घोषवादनाच्या निनादात ती मूर्ती समाधी मंदिरात समाधीच्या शेजारी ठेवण्यात आली. मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहण्याकरता कित्येक भक्तांना व्यवस्थापन समितीच्या वतीने निमंत्रणे पाठवण्यात आली.

मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसमयी विष्णूयाग व्हावा व त्यावेळी पवमान पंचसुक्ताचे, तीळाचे मुख्यत्वे हवन व्हावे असे ठरवण्यात आले होते. पवमानाच्या ४१ आवृत्या म्हणजे दोन लघु विष्णू करावयाचे ठरवण्यात आले. याकरता मुंबई व ठाणे येथून बारा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आणण्याचे निश्चित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

Teachers Day 2025: शिक्षक दिन करा स्पेशल, तुमच्या शिक्षकांना अन् गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गतील विरंगुळ्याचे ठिकाण, जोडीदारासोबत घालवा निवांत संध्याकाळ

पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३,९७६ जणांना नोटिसा, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT