

अलीकडेच एअरटेलने त्यांच्या युजर्ससाठी वर्षभर perplexity pro सबस्क्रिप्शन मोफत देण्याची घोषणा केली होती. आता, रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी धमाकेदार घोषणा केली आहे. जिओने गुगलसोबत पार्टनरशिप केली. यानंतर, गुगुलसोबत मिळून युजर्संला फ्री AI Pro सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा केली आहे. जिओच्या मते, पात्र युजर्सला १८ महिन्यांसाठी गुगल एआय प्रो चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. या सबस्क्रिप्शन किंमत ३५,१०० रुपये आहे. कंपनीने म्हटले की, युजर्संना ३५,१०० रुपयांची सर्विस मोफत मिळणार आहे.
कंपनी का देत आहे फ्री सबस्क्रिप्शन?
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या भारत देशात आहे. म्हणून जेवढे जास्त युजर्स तेवढ जास्त डेटा. म्हणूनच आधी perplexity pro आणि चॅटजीपीटीने भारतीय युजरसाठी त्यांचे प्रो सबस्क्रिप्शन मोफत केले आणि आता गुगलही फ्री सबस्किप्शन देत आहे. (perplexity pro) परप्लेक्सिटी प्रोने युजर्सना त्यांचे प्रो सबस्क्रिप्शन मोफत देण्यासाठी एअरटेलसोबत भागीदारी केली. याआधी, ओपनएआयने देखील सर्व भारतीय युजर्सना चॅटजीपीटी गो चे मोफत सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा केली होती.
गुगल एआय प्रो मध्ये काय मिळणार?
जिओ युजर्स My Jio अॅपद्वारे मोफत गुगल एआय सबस्क्रिप्शन मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये फक्त एआयच नाही तर २ टीबी क्लाउड स्टोरेज देखील फ्री मिळते. याशिवाय, नोटबुक एलएम आणि जेमिनी २.५ प्रो यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनचा देखील समावेश आहे. गुगल एआयच्या या सबस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ जनरेशन मॉडेल Veo 3.1 आणि जेमिनी नॅनो बनाना Gemini Nano Banana समाविष्ट आहे
कोणाला मिळणार मोफत गुगल एआय प्रो?
कंपनीने म्हटले आहे की, सुरुवातीला १८ ते २५ वयोगटातील युजर्स जे अनलिनिटेड जिओ ५ जी प्लॅन वापरत आहेत त्यांनाच या सेवेचा फायदा घेता येणार आहे. परंतु, कंपनी नंतर ही ऑफर भारतातील सर्व जिओ युजर्ससाठी लागू करणार आहे.
जिओ युजर्स असं मिळवू शकतात गुगल एआय प्रो
जिओ युजर्स MyJio अॅपद्वारे १८ महिन्यांसाठी Google AI Pro मोफत मिळवू शकतात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, Google AI Pro हे प्रीमियम टियर सबस्क्रिप्शन आहे आणि ते मासिक आणि वार्षिक प्लॅनसोबत येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.