Shraddha Walker Case Maharashtra Minister Mangal Prabhat Lodha Saam TV
मुंबई/पुणे

श्रद्धा वालकर घटनेनंतर राज्यातील मंत्र्यांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक तरूणी...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर अवघा देश हादरून गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

Missing Girls From Maharashtra : महाराष्ट्रातील श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या झाल्याच्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला आहे. आफताब यानं तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा संशय व्यक्त करतानाच अशा प्रकारे अनेक तरुणी बेपत्ता झाल्याची शक्यता महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. या तरुणींच्या शोधासाठी महिला आयोगाने विशेष पथक नेमले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत आफताब यानं हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. श्रद्धाच्या हत्येचा तपास केला जात आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस प्रत्येक अँगल तपासून बघत आहे.

आफताबला कठोर शिक्षा व्हावी यासाठी दिल्ली पोलीस (Police) सर्व ठोस पुरावे गोळा करत आहे. त्यादृष्टीने कसून तपास सुरू आहे. तर कोर्टानंही आफताबच्या नार्को चाचणीला मंजुरी दिली आहे. या पाच दिवसांत आफताबची नार्को चाचणी करण्यात यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या घटनेमुळं महाराष्ट्रही हादरला आहे. राज्यातील अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याच्या मुद्दाही ऐरणीवर आला आहे. आता त्यातच अशा प्रकारे बेपत्ता झालेल्या तरुणींचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

राज्य महिला आयोग आणि जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई उपनगर यांच्या वतीनं सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची मागणी लावून धरली आहे. अफताबने श्रद्धा वालकर या तरुणीची ज्या प्रकारे निर्घृण हत्या केली, तसेच महाराष्ट्रातील अनेक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकून बेपत्ता झाल्या आहेत, अशी शक्यता लोढा यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी महिला आयोगाद्वारे विशेष पथक नेमले पाहिजे, अशी मागणीही लोढा यांनी केली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT