Vikas Walkar PC
Vikas Walkar PC ANI
मुंबई/पुणे

Shraddha Walker Case: धर्म जागृती झाली पाहीजे, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर विचार व्हावा; श्रद्धाचे वडील काय म्हणाले?

जयश्री मोरे

Shraddha Walker Murder Case: देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज, श्रद्धाचे वडिल विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्रद्धाच्या वडीलांनी एक वेगळा मुद्दा मांडला आहे. १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे स्वातंत्र्य दिले जाते त्यावर विचार व्हावा असं श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले आहेत. तसेच धर्मजागृतीही करण्यात यावी अशी मागणी विकास वालकर यांनी केली. त्याचप्रमाणे श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याला फाशीची शिक्षा व्हावी आणि आफताब पूनावाला याचे आई-वडिल आणि परिवाराचीही चौकशी करुन त्यांनाही कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. श्रद्धाला न्याय मिळवून देण्याच आश्वासन फडणवीसांनी दिलं असल्याचं विकास वालकर म्हणाले. यावेळी वालकर यांच्यासोबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील होते. (Vijay Walkar Press Conference)

श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले की, दिल्ली न्यायालय आणि दिल्ली पोलिसांनी मला सांगितलं आहे की, तुम्हाला न्याय मिळवून देणार. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिले आहे, की न्याय मिळवून देणार त्यांचे आभार, नीलम गोऱ्हे यांचे सुद्धा आभार. किरीट सोमय्या यांनीदेखील खूप मदत केली. मुलीचा मृत्यू झाला याबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत.

दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे चांगले काम सुरू आहे, मात्र, सुरुवातीला वसई पोलिसांच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास झाला त्याबद्दल तपास व्हावा नाहीतर माझी मुलगी वाचली असती असं ते म्हणाले. आफताब पूनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रुरतेने हत्या केली असून त्याला फाशीची शिक्षा झाली आहेत. त्याचे भाऊ आणि त्याच्या घरच्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विकास वालकर यांनी केली आहे. (Maharashtra News)

पुढे ते म्हणाले, माझे काही प्रश्न आहेत, १८ वर्षानंतर जे व्यक्तिस्वातंत्र्य दिले जाते यावर विचार करावा. तसेच काही अॅपवर सुद्धा विचार करुन धर्मजागृती करण्यावर भर दिला पाहिजे. माझ्या मुलीबाबत जे झालं ते दुःखदायक झालं, यापुढे असं कोणाचंही होऊ नये अशी माझी अपेक्षा. ज्याप्रकारे आफताब पूनावालाने माझ्या मुलीला मारलं त्यासारखीच त्याला ही शिक्षा मिळावी असंही ते म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, माझी मुलगी जेव्हा घर सोडून गेली तेव्हा ती मला बोलली की मी आता नाबालिक नाही. त्यामुळे 18 वर्षानंतर दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यावर विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मी एक वेळ फक्त आफताबच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याच्या आईसोबत माझं बोलणं झालं. पण मला तेव्हा व्यवस्थित उत्तर देण्यात आलं नाही. श्रद्धाने 2019 ला जेव्हा तक्रार केली होती याबद्दल मला याबाबत तेव्हा माहिती नव्हती असंही विकास वालकर म्हणाले. (Breaking Marathi News)

पुढे त्यांनी माहिती दिली की, एकदा आफताब सोबत 26 सप्टेंबरला बोलणं झालं तेव्हा मी विचारलं माझी मुलगी कुठे आहे? तुझ्यासोबत दोन-अडीज वर्ष राहत होती. तेव्हा त्याने मला सांगितलं मला माहित नाही ती कुठे गेली. मी त्याला विचारलं की, ही तुझी जबाबदारी आहे. तुझ्यासोबत एवढी वर्ष राहीली त्यावर तो काही बोलला नाही अशी माहिती विकास वालकर यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जुमला पर्व संपतंय, येत्या ४ जूनपासून अच्छे दिन येतील; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भाजपवर टीका

Health Tips: या लोकांनी फणस खाऊ नये

Today's Marathi News Live: अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

SCROLL FOR NEXT