Latest Pune News: पुणे शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढल्याने आयसीयू बेड्सची उपलब्धता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. ५ जानेवारीपासून २०५ रुग्ण जीबीएस व्हायरसने बाधित झाले आहेत. यापैकी १०० पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असला, तरी ५० रुग्ण अद्याप अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
विशेषतः २० जण व्हेंटिलेटरच्या साहाय्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा मोठ्या ताणाखाली आहे, आणि तातडीने उपाययोजनांची आवश्यकता भासते आहे. रुग्णालय प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना राबवत आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी येणाऱ्या महागड्या खर्चामुळे अनेक कुटुंबीय सरकारी रुग्णालयांचा आश्रय घेत आहेत.
खासगी रुग्णालयांमध्ये इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन (आयव्हीआयजी) च्या एका डोससाठी सुमारे २०,००० रुपये खर्च येतो. मात्र, सरकारी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत आयव्हीआयजी आणि प्लाझ्माफेरेसिस मोफत उपलब्ध असल्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रचंड खर्चामुळे काही कुटुंबांना खाजगी रुग्णालयांमधून रुग्णांना हलवावे लागले. गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनक्रिया बंद पडण्याचा धोका असल्याने आयसीयूमध्ये त्वरित दाखल होणे गरजेचे आहे. सरकारी योजनांमुळे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून, उपचारांच्या आर्थिक अडचणी कमी झाल्या आहेत.
गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनक्रिया बंद पडण्याचा धोका असल्याने आयसीयूमध्ये त्वरित दाखल होणे गरजेचे आहे. सरकारी योजनांमुळे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून, उपचारांच्या आर्थिक अडचणी कमी झाल्या आहेत. पुण्यातील नवले रुग्णालयाने 20 जानेवारीपासून गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या असामान्य वाढीची नोंद केली आहे. सध्या रुग्णालयात सहा GBS रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी पाच अतिदक्षता विभागात असून तीन रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.
37 ICU बेड असलेल्या रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय संसाधनांवर आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. GBS रुग्णांना 100% ICU सपोर्ट आणि सतत तज्ज्ञांचे लक्ष आवश्यक असल्याने, डायलिसिस किंवा हृदय शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांना स्थिर होईपर्यंत आपत्कालीन कक्षांमध्ये ठेवले जात आहे. प्रादुर्भाव अद्याप सुरू असल्याने दबाव वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.