धावत्या ट्रेनमधून गायब झाला, तब्बल १३ दिवसांनी भंडाऱ्यातील 'तो' जवान मध्यप्रदेशात सापडला; नेमका होता कुठे?

Madhya Pradesh: भारतीय सेनादलातील जवान गुड्डू मुकेश सिंग गौड, जो धावत्या रेल्वेतून गायब झाला होता, १३ दिवसांनी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील चिंचोली गावात स्थानिक नागरिकांना आढळला. किरकोळ जखमी अवस्थेत तो सध्या रुग्णालयात आहे.
Bhandara
Bhandarasaam tv
Published On

धावत्या रेल्वेतून अचानक गायब झालेल्या भारतीय सेनादलातील जवान गुड्डू मुकेश सिंग गौड याचा अखेर १३ दिवसांनी शोध लागला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील चिंचोली गावात तो स्थानिक नागरिकांना आढळला. किरकोळ जखमी अवस्थेत असलेल्या गुड्डूला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरठी पोलिस व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास भारतीय सेनादलाचे अधिकारी करतील, असे सांगण्यात आले आहे.

भंडारालगतच्या भोजापूर येथील गुड्डू सिंग भारतीय सेनेत कार्यरत होता. डिसेंबर महिन्यात लग्नासाठी तो सुट्टीवर स्वगावी आला होता. सुटी संपल्यावर ३१ डिसेंबर रोजी भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून ड्युटीवर परतण्यासाठी रेल्वेने प्रवासाला निघाला होता. मात्र, तो अचानक गायब झाल्याने कुटुंबीय व परिसरात खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी त्याच्या हरवल्याची तक्रार वरठी पोलिस ठाण्यात नोंदवली होती.

Bhandara
PMPML: पुणेकरांसाठी खुशखबर! पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच १००० नव्या बसचा होणार समावेश

१३ दिवसांनंतर गुड्डूच्या वडिलांना अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्यामध्ये त्यांचा मुलगा बैतूल जिल्ह्यातील चिंचोली गावात असल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच वडिलांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक नीलेश गिरी यांनी बैतूल जिल्हा पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून स्थानिक पोलिसांना गुड्डू सिंगला ताब्यात घेण्यासाठी पाठवले.

Bhandara
Crime News: मोमोज खायला निघाल्या, वाटेत दोघांनी मायलेकांना छेडलं; नागरिकांकडून तरुणांची धुलाई

स्थानिक पोलिसांनी गुड्डूला शोधून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा आहेत, पण त्या जखमा कशामुळे झाल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर मागील १३ दिवसांपासून तो कुठे होता आणि त्याच्या गायब होण्यामागचे कारण काय आहे, हे गूढ कायम आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून या घटनेने कुटुंबीय व पोलिस प्रशासनात चिंता व्यक्त केली जात आहे.

Bhandara
Maharashtra Politics: 'येतो झाकी है और बहुत कुछ बाकी है' राजन साळवींच्या पक्षप्रेवशावर शिंदे सेनेच्या नेत्याचे वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com