संजय गडदे , साम प्रतिनिधी
अंधेरी येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा 59 वे वर्षी गणेशोत्सव साजरा करत आहे. या वर्षी मंडळाने दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नवीन तयार केलाय. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पूर्ण कपडे घालून जावे लाणणार आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे.
यावर्षी भव्य दिव्य देखाव्यासाठी अंधेरीतील हे मंडळ प्रसिद्ध आहे. या मंडळानं यंदा राजस्थान मधील पाटवा की हवेलीची प्रतिकृती साकारली आहे. या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण अनुभवयाला मिळणार आहे. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतींमध्ये हवेलीच्या झरोख्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण देखील येथे पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे भारतीय सांस्कृतिक इतिहासाची समृद्धता अधोरेखित होणार आहे, मात्र मंडळा दर्शनासाठी घातलेल्या नियमामुळे हे मंडल चर्चेत आले आहे.
अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मंडळाकडून बाप्पाचे चरण स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी दिली जाते मात्र या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी शॉर्ट कपडे घालू नये. ज्या महिला किंवा मुली शॉर्ट कपडे घालून दर्शनाला येते इथे रोखण्यात येईल आणि त्यांना मंडळाकडून शाल किंवा शरीर झाकले जाईल असे कपडे दिले जातील असे मंडळाचे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले.
अंधेरी चा राजा हा नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे मुंबईकरांचे गणेश भक्तांची अंधेरीचा राजावर मोठी शृता आहे यामुळे या ठिकाणी नवस पूर्ण झालेल्या गणेश भक्तांकडून मूर्ती मंडळाला जंगी म्हणून दिली जात आहे यावर्षी मंडळ 59 वी वर्षे साजरे करत आहे मात्र शंभर वर्षांपर्यंत या ठिकाणी मूर्ती देणगी दान निश्चित झाले आहे असेही चिटणीस यांनी यावेळी सांगितले.
आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती यंदा गणेशोत्सवाचा ५९ वा वर्ष साजरा करीत आहे, आणि सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात.आझादनगर सार्वजनिक उत्सव मंडळानं दीड महिन्यापासून या भव्य सजावटीसाठी कलादिग्दर्शक धर्मेश शहा यांच्याकडून ही कला साकारत असल्याची माहिती लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक राणे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कलादिग्दर्शक धर्मेश शहा यांचे कलाकार विविध कला साकारतात. त्यातच यंदा राजस्थान येथील पाटवा की हवेली साकारण्याची संकल्पना मंडळातील पदाधिकाऱ्यांना सुचली आणि त्याप्रमाणं सजावट करायची ठरवण्यात आलं, अशी माहिती मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.