Pune Traffic: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, अवजड वाहनांवर बंदी

Heavy Vehicles Ban In Pune: पुण्यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये म्हणजेच वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ५ ते १८ सप्टेंबर दरम्यान शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
Pune Traffic: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, अवजड वाहनांवर बंदी
Pune Traffic Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये वाहतुकीच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे ट्राफिक पोलिसांनी गणेशोत्सव काळामध्ये पुणे शहराच्या मध्यभागामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. ५ ते १८ सप्टेंबर दरम्यान पुणे शहरातील मध्यभागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनसार, पुण्यामध्ये गणेशोत्सव काळात शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या काळात शहरात मध्यभागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते १८ सप्टेंबर दरम्यान शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या काळात शहराच्या मध्य भागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहतूक बदलांची काटेकोर पद्धतीने पालन करण्यात यावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Pune Traffic: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, अवजड वाहनांवर बंदी
Pune Crime: धक्कादायक! उलटी केल्यामुळे गर्लफ्रेंडच्या मुलासोबत केलं भयंकर कृत्य, बॉयफ्रेंडला अटक

पुण्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त पुण्यामध्ये देशभरातून नागरिक येत असतात. पुण्यातील गणेशोत्सवात गणेश मंडळांनी केलेली आकर्षक सजावट, मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. फक्त देशातील नाही तर परदेशातील नागरिक देखील येत असतात. या काळात मध्य भागात मोठी मंडळे देखावे सादर करत असतात. त्यामुळे याठिकाणी जास्त वाहनं आल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातल्या मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता यानियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ट्राफिक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Pune Traffic: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, अवजड वाहनांवर बंदी
Pune Crime News: पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; भयानक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com