Shops vandalised by MNS workers in Pune, 20 to 22 people police registered case  Saam TV
मुंबई/पुणे

Pune MNS News: मनसेच्या 'खळखट्याक'ला पुणे पोलिसांचा दणका; दुकानांच्या तोडफोड प्रकरणी २० ते २२ जणांवर गुन्हा

Pune Latest News: पुण्यात दुकानांची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

Satish Daud

Pune MNS Protest Police Action

राज्य सरकारच्या आदेशानंतरही दुकानांवर मराठी पाट्या लावण्यास विलंब करणाऱ्या दुकानदारांना मनसेने शुक्रवारी चांगलाच इंगा दाखवला. पुण्यात मराठी पाट्या न लावलेल्या दुकानांची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिस आणि मनसैनिकांमध्ये झटापट देखील झाली. दरम्यान, दुकानांची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यात (Pune News) मनसेने केलेल्या खळखट्याक आंदोलन प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजेंद्र वागस्कर यांच्यासह २० ते २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले असून एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या (Police) या कारवाईमुळे मनसे कार्यकर्ते आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विविध शहरात दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मुदत उलटून गेल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने बुधवार २९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक काढले होते.

शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत, मराठी भाषेत लावणे बंधनकारक केले आहे. जे व्यावसायिक मराठीमध्ये पाट्या लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे आदेश आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले.

दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी याबाबत मनसेकडून पुणे महानगरपालिकेला पत्र देण्यात आले होते. तसेच महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी शहरात जंगली महाराज रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत दुकानांची तोडफोड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT