Tejas More/Pravin Chavhan/Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

महाजनांनंतर फडणवीसांचा नंबर, मी चव्हाणांना देव मानायचो; तेजस मोरेचे धक्कादायक खुलासे (पहा Video)

दिवसभर खोटे जबाब तयार करणं, खोटे माफीचे साक्षीदार तयार करणं, गिरीश महाजनला कुठे अडकवायचं, गिरीश महाजनांना ड्रग्ज मध्ये अडकवता येईल का? खरंच मोक्का कसा लावता येईल, या संदर्भात त्यांची चर्चा चालूच रहायची

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत 'पेनड्राईव्ह बॉम्ब' फोडत सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) आणि राज्या सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्व प्रकरणात फडणवीस यांना हा सर्व डाटा पुरवण्याचं काम तेजस मोरे (Tejas More) याने केलं असल्याचा आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. त्यानंतर आज तेजस मोरे यांच्याशी सामच्या रिपोर्टरनी बातचीत केली असता त्यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Shocking revelations of Tejas More, the number Fadnavis after Mahajan)

वाचा काय म्हणाले सचिन चव्हाण

रिपोर्टर - प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात जे स्टिंग ऑपरेशन झाले आहे ते तुम्ही केलंय असा आरोप प्रवीण चव्हाणांनी केलाय,

तेजस - हास्यास्पद आरोप आहेत, एकही पुरावा न देता उचलली जीभ टाळ्याला असा प्रकार आहे. एकदम हास्यास्पद आरोप आहेत हे, बेछूट आरोप आहेत, कुणाचं तरी आयुष्य संपवायचं हे प्रवीण चव्हाणांचा आज नाही 2012 पासूनचं काम आहे

रिपोर्टर - तुमचं आरोपांबाबत काय म्हणणं आहे?

तेजस - आरोपच चुकीचे आहेत, बेसलेस आहे, त्यामुळे काही म्हणायचा प्रश्नच येत नाही

रिपोर्टर - तुमची आणि प्रवीण चव्हाणांची ओळख कशी आहे?

तेजस - माझी आणि त्यांची ओळख जुलै 2022 मध्ये झाली, 21 मध्ये झाली

रिपोर्टर - कशी ओळख झाली ?

गिरीश महाजनांना ड्रग्ज मध्ये अडकवता येईल का?

तेजस - माझ्यावर गुन्हा दाखल होता, त्याच्यात त्यांनी जामीन करुन दिला होता त्यामुळे मी त्यांना देव मानायचो, त्यामुळे त्यांच्या ऑफिस ला येत जात राहायचो, तेव्हा ते ड्रफ्ट करायचे, तेव्हा ते म्हणाले की माझं इग्लिश थोड कच्चं आहे,तुझी इंग्लिश वर चांगली कमांड आहे त्यामुळे मला 2 ते 3 ड्रफ्ट करून दे, त्यामुळे मी ड्रफ्ट करून दिले त्यांना ते आवडलं, त्यामुळे ते म्हणाले 8 , 15 दिवस येत जा ऑफिस ला, मलाही मेंटल ट्रोमा मधून निघायचं होतं, म्हणून मी त्यांच्याकडे जात होतो, नंतर हळूहळू मलाही थोड्या गोष्टी समजत गेल्या की जी आमची चर्चा व्हायची की गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) जो आरोप झालेला आहे.

पहा व्हिडीओ -

त्यांची FIR त्यांनीच ड्रफ्ट केली होती ते त्यांनीच मला सांगितलं,नंतर त्या संदर्भात साक्षीदारांचे जबाब घ्यायचे आहेत ते त्यांनी माझ्याकडून ड्रफ्ट करुन घेतले, ते डिक्टेट करायचे आणि मी लिहायचो, टायपिंग करुन साक्षीदारांना बोलावून as it is जबाब रेकॉर्ड करायला लावायचे, कळत नकळत मला माहित नव्हतं, मला कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे मला वाटायचं प्रवीण चव्हाण सरकारी वकील असल्याने असं करु शकतात पण नंतर मला हळूहळू समजत गेलं की एवढे अधिकार नाही, हे जे करताहेत ते खडसे साहेबांच्या सांगण्यावरुन किंवा अजून कोणाच्या संगण्यावरून करत आहे

रिपोर्टर - या गिरीश महाजनांच्या केस संदर्भात तुमचं गिरीश महाजन किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाशी बोलणं झालंय का

तेजस - दिवसभर तेच काम असायचं खोटे जबाब तयार करणं, खोटे माफीचे साक्षीदार तयार करणं, गिरीश महाजनला कुठे अडकवायचं, महाजनांना ड्रग्ज मध्ये अडकवता येईल का? खरंच मोक्का कसा लावता येईल, या संदर्भात त्यांची चर्चा चालूच रहायची

रिपोर्टर - म्हणजे खोट्या पध्दतीनं गिरीश महाजनांना कसं अडकवता येईल यावर चर्चा झालीय तुमची आणि प्रविण चव्हाण यांची

तेजस - हो हो गिरीश महाजन आणि नंतर नंबर होता फडणवीस (Devendra Fadnavis) साहेबांचा.

रिपोर्टर - बर बर आणि आणखी एक विचारायचय प्रविण चव्हाणांनी थेट तुमच्यावर आरोप केलाय मग तुमचे इतके चांगले संबध असताना तुमच्यावर असे आरोप करण्यामागचं काय कारण असु शकत

तेजस - जानेवारी 2022 मध्ये जगळगावला भोईटे गटांच्या घरी रेड झाली होती ती प्रविण चव्हाण यांनीच केली होती. दोन दिवसांपुर्वी त्यांनी माझ्या थ्रु पोलिसांना निरोप पाठवून सगळी काम केली. की किती पोलिस पाहिजेत, त्यांची रहायची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था कुठ करायची माझ्याकडं सगळे What'sApp कम्युनिकेशन आहेत जे मी पुरव्यासहीत दाखवणार आहे. प्रविण चव्हाण जे म्हणातेहेत जे व्हिडीओ आहेत, जे व्हिडीओ बरोबर आणि ऑडिओ चुकीचे आहेत. ठिकय आता मला त्याच्यात जायच नाही. ज्यानं कोणी स्टिंग ऑपरेशन केल असेल त्याला मी धन्यवाद देतो त्यांनी प्रविण चव्हाण यांचा काळा चेहरा समोर आणला. पण आता जे व्हॉटअसअप चॅट आहेत माझे आणि त्यांचे किंवा माझे आणि संबधीत पोलिसांचे ते काय चुकिचे आहेत का हे प्रविण चव्हाण यांनी सांगावे.

रिपोर्टर - पण आता काही वेळापुर्वी तुम्ही प्रविण चव्हाणांना म्हणालात की तुम्ही त्यांना देवमाणुस माणत होतात की एका गुन्हातून त्यांनी तुम्हाला जामिन मिळवून दिला आणि अस काय घडल की एका रात्रीत ते तुमच्यासाठी व्हिलन झाले आणि आता तुम्ही काळी बाजू म्हणातात

तेजस - जानेवारी 2022 पासून मला समजायला लागल हे सगळ खोट करताहेत त्यामुळ मी हळूहळू त्यांच्यापासून बाजूला होत गेलो. नंतर त्यांचा एक मास्टरमाईंड असा होता की इनकेस पुढ जाऊन काही झाल तर प्रविण चव्हाणची होणार नाही, कारण प्रविण चव्हाण स्वत: काहीच करत नव्हते माझ्याथ्रुच करत होते सगळं.

रिपोर्टर - तुम्ही मीडिएटर होता म्हणजे

तेजस - माझ्याथ्रु म्हणजे, मीडिएटर नाही म्हणता येणार. अटकेल तर तेजस मोरे अटकेल

रिपोर्टर - तुमचा व्यवसाय काय आहे म्हणजे वकिलीशी तुमचा काय संबध आहे का

तेजस - नाही नाही आजिबात नाही.

मी लवकरच मीडियासमोर येणार आहे आणि पुराव्यांसहित येणार आहे.

रिपोर्टर - तरी ड्राफ्ट वैगेरे तयार करण

तेजस - मी आधी सांगीतल्याप्रमाण माझ इंग्लिशवर कमांड चांगल असल्यामुळं केवळ ड्राफ्टिंग माझी चांगली होती, अक्षर चांगल असल्यामुळं त्यांनी मला सांगितल की तुम्ही करा आणि त्यांना कोणीतरी व्यक्ति पाहिजेच होता की ज्याच्याथ्रु सगळ करता येईल.

रिपोर्टर - सर तुम्हाला कुठ भेटता येऊ शकत आम्हाला

तेजस - मॅडम मी लवकरच मीडियासमोर येणार आहे आणि पुराव्यांसहित येणार आहे.

रिपोर्टर - तुम्ही या संदर्भात काही तक्रार, गुन्हा दाखल करणार आहात ?

तेजस - मॅडम मी माझ्या वकिलांशी चर्चा करून पुढची डायरेक्ट, मला दिसतय की प्रविण चव्हाण होत्याच नव्हत आणि नव्हत्याच होत करतात. त्यामुळं प्रविण चव्हाण काय करू शकतात याचा नेम नाही. पण तरी मी कायद्याच जे असेल जे करता येईल ते करणार.

रिपोर्टर - पण प्रविण चव्हाणांकडून तुम्हाला काही, तुमच्या कुटुंबाला काही धोकाय अस तुम्हाला म्हणायचय का

तेजस - धोका नाही नाही. प्रविण चव्हाण आपण जे म्हणतो बॉडी बाबत नाही नाही पण खोट्या गुन्ह्यात अडकवणे काहीतरी वेगळ करणे ते प्रविण चव्हाण करु शकतात.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT