marathi ssc student  Saam tv
मुंबई/पुणे

मराठी भाषेतच ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीच्या निकालातून धक्कादायक वास्तव उघड

ssc result news : मराठी भाषेतच ९४ हजार विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आलं आहे. ९४ हजार विद्यार्थी मराठी भाषेत नापास झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Akshay Badve

दहावीच्या निकालाचं धक्कादायक वास्तव उघड

दहावीच्या निकालाची दुसरी बाजू समोर आली आहे

दहावीत मराठी विषयात ९४ हजार विद्यार्थी नापास

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज शुक्रवार जाहीर झालाय. दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी ११ वाजता जाहीर झाला. दहावीचा निकाल झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मात्र, दुसरीकडे या निकालातून धक्कादायक वास्तव देखील उघड झालं आहे. महाराष्ट्रात यंदा मराठी विषयात ९४ हजार विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आलं आहे.

महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के जाहीर झाला. तर राज्यात यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. १७९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला असून नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. दहावीच्या या निकालाची दुसरी बाजू देखील समोर आली आहे.

राज्यात प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून परीक्षा देणारे सुमारे १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थी होते. यापैकी ८० हजार ८०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आलं आहे. तर इयत्ता दहावीत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून एकूण ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी नापास झाले. एकूण ९४ हजार विद्यार्थी मराठी भाषेत नापास झाल्याने अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषा फक्त सोशल मीडिया आणि कागदावरच आहे का, असा सवाल लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यंदा गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी निकाल २ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली. विभागवारनुसार कोकण विभागात अनेक वर्षांपासून अव्वल स्थानी राहण्याची स्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT