Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Crime News : मुलीचे हात पाय चिकटपट्टीने बांधले, लेकीची हत्या करून आईने आयुष्य संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News : पुण्यात जन्मदातीने २ वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलीस तपास करत असून घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • 2 वर्षांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

  • पोटच्या लेकीची हत्या करून आईची आत्महत्या

  • मुलीला झालेल्या आजारामुळे आई नैराश्यात होती

  • घटनेने परिसरात खळबळ

अक्षय बडवे, पुणे

मुलीच्या आजाराला कंटाळलेल्या आईने पोटच्या लेकीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. सदर घटना पुण्यातील पुन्हगीळ वारजे भागात घडली आहे. मृत मुलीचे नाव शारवी आदिनाथ देवडकर (वय २) आणि तिच्या आईचे नाव छाया आदिनाथ देवडकर (वय २८) असे आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया चे पती आदिनाथ देवडकर, पत्नी छाया आणि मुलगी शारवी असे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास होते. शारवीला अस्थिविकार असल्याचे निदान झाले होते. त्याबाबत उपचार सुरू होते. मुलीला झालेल्या या आजारामुळे छाया नैराश्यात होत्या. शुक्रवारी आदिनाथ कामानिमित्त बाहेर गेले होते.

दुपारी दीडच्या सुमारास ते कामावरून घरी आले. त्यावेळी शारवी त्यांना घरातील पाळण्यात निपचित पडलेली दिसली. तिचे हात पाय चिकटपट्टीने बांधण्यात आलेले होते. तसेच पत्नी छायाने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे घाबरलेल्या आदिनाथ याने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साडी विक्रीची जाहिरात, महिलांची चेंगराचेंगरी, 5000 ची साडी फक्त 599 रुपयांत

डोनाल्ड ट्रम्पच्या निशाण्यावर भारत?व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर भारताला धमकी

Panchratna pickle: घरच्या घरी कसं बनवाल चटपटीत पंचरत्न लोणचं?

Maharashtra Live News Update : महापालिका प्रचाराला वेग, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

EPF Withdrawal: कोणत्या कारणांसाठी आणि किती PF काढू शकतात? प्रत्येक कर्मचाऱ्याला हे नियम माहित असायलाच हवेत

SCROLL FOR NEXT