crime News
crime News  saam tv
मुंबई/पुणे

Pune News : धक्कादायक! धावत्या रेल्वेतून २ वर्षांच्या मुलीला आणि पत्नीला बाहेर ढकलले; पुण्यातील खळबळजनक घटना

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि मुलीला ढकलून दिल्या धक्कादायक प्रकार केला आहे. पुण्यातील खडकी रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत २ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एक खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आकाश भोसले असे मृत बालिकेचे नाव आहे. तर वृषाली असे तिच्या आईचे नाव असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. आकाश हा गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आकाशने पत्नी वृषालीला हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले होते. तो पत्नी आणि मुलीला घेऊन रेल्वेने मुंबईला (Mumbai) जात होता. खडकी रेल्वे स्थानक आल्यानंतर त्याने दाराजवळ बोलावले. त्यावेळी आर्या ही वृषाली यांच्या कडेवर होती. त्याचवेळी आकाशने दोघी मायलेकींना धक्का मारून धावत्या रेल्वेतून ढकलून दिले.

या प्रकारानंतर प्रवाशांनी तातडीने रेल्वेची साखळी ओढून रेल्वे थांबवली. या घटनेत दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. दोघी मायलेकींनी ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाला. आकाश एका हत्येच्या गुन्ह्यात सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT