Crime News: धक्कादायक! किरकोळ वादातून तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, तीन तासात आरोपी अटकेत

या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली असून तीन तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे..
Maval Vadgaon Crime News
Maval Vadgaon Crime News saam tv

Vadgaon News: राज्यातील गुन्हांची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील पाटण तालुक्यात दोघांचा खून झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेची राज्यात चर्चा सुरू असतानाच माजली असतानाच मावळातही किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

Maval Vadgaon Crime News
Sanjay Raut News : संजय राऊत यांचा हक्कभंग समितीवर आक्षेप; थेट विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र, वाचा

याबाबत अधिक माहिती अशी की, दारुच्या नशेत किरकोळ भांडणातून डोक्यात दगड घालून युवकाचा खून केल्याची घटना मावळातील ब्राम्हणवाडी या गावात उघडकीस आली आहे. सौरभ शैलेंद्र मयेकर वय एकवीस असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून आरोपींना पोलिसांनी तीन तासात अटक केली आहे. खुनाच्या घटनेने ब्राह्मणवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maval Vadgaon Crime News
Mohit Kamboj News: 'उद्धव ठाकरेंच्या फ्रंटमॅनला अटक; काऊंटडाऊन सुरू...' मोहित कंबोज यांचा इशारा; ट्विट चर्चेत

या हत्येमागे नेमके काय कारण होते, कोणत्या कारणाने तरुणाची हत्या करण्यात आली, असे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याबाबतचा अधिक तपास वडगाव पोलिस करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com