Navi Mumbai Kamothe School Bus Rape case News  AI Image
मुंबई/पुणे

Shocking : नवी मुंबई हादरली! स्कूल बसमध्ये ३ वर्षीय चिमुकलीसोबत चालकाचं विकृत कृत्य ; अंगाला हात लावला अन्...

Navi Mumbai Kamothe School Bus Rape Case : नवी मुंबईतील कामोठे परिसरात खासगी शाळेच्या बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप. पोलिसांनी ३० वर्षीय बसचालकाला अटक केली असून पनवेल न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Alisha Khedekar

  • कामोठ्यात खासगी शाळेच्या बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

  • या प्रकरणी ३० वर्षीय बसचालकाला पोलिसांनी अटक केली

  • वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार झाल्याचे निष्पन्न

  • आरोपीविरोधात BNS आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतून संतापजनक बातमी समोर आली आहे. कामोठे परिसरात एका खासगी शाळेच्या बसमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय बसचालकाला अटक केली असून, पनवेल न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संबंधित खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बसवर चालक म्हणून काम करत होता. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याने कामोठे येथील बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी बसमधून प्रवास सुरू केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर संबंधित तीन वर्षांची चिमुकली काही वेळ बसमध्ये एकटी राहिली. याच दरम्यान आरोपी चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चिमुकलीला घरी सोडण्यात आले.

घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने पोटदुखी होत असल्याची तक्रार केली. यावेळी तिने आपल्या आजीला बसमधील चालकाने तिच्यासोबत चुकीचे कृत्य केल्याचे सांगितले. चिमुकलीने सांगितलेली माहिती ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. आजीने तातडीने शाळा व्यवस्थापनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आणि आरोपी बसचालकाला अटक केली. चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तपासणीदरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील (BNS) १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासंदर्भातील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचीही चौकशी केली जाणार आहे. शाळा व्यवस्थापनातील संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

ISRO : चीन-पाकिस्तानची धाकधूक वाढली! भारताने अवकाशात सोडला 'नवा डोळा'; अर्थ इमेजिंग सॅटेलाइट EOS-05 बाबत मोठी अपडेट

Daily tea intake: 1 दिवसाला किती कप चहा प्यायला पाहिजे? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Pink VS White Guava: गुलाबी की पांढरा पेरू? दोघांपैकी कोणता आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या!

Kidney Damage : सकाळी उठताच शरीरात जाणवणारे 'हे' ५ बदल, किडनी खराब होण्याचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT