Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : सावित्रीदेवी फुले हॉस्टेल विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, फॉरेन्सिक रिपोर्टमधून खुलासा

Crime news Update : मुलीने आरोपीचा प्रतिकार केल्याच देखील उघड झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News : चर्चगेट येथील सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृह विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं आहे.

मुलीने आरोपीचा प्रतिकार केल्याच देखील उघड झालं आहे. न्याय वैद्यकीय शाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मुलीच्या नखात सापडलेले डीएनए प्रोफाइल आरोपी ओम प्रकाश कनोजियाच्या डीएनएशी मॅच झाले आहेत.  (Latest Marathi News)

घटनास्थळी मिळालेल्या विर्याचे डाग (semen stain) हे देखील आरोपीचे असल्याचं स्पष्ट झालं आहे. सहा जूनला वसतिगृहात मुलीची हत्या केल्यानंतर कानोजियाने धावत्या लोकलखाली येत आत्महत्या केली होती.  (Mumbai News)

नखात आरोपीचे डीएनए प्रोफाईल सापडल्याने पीडितेने प्रतिकार केल्याचं उघड झालं आहे. प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार न झाल्याचं म्हटल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. एकतर्फी प्रेमातून कनोजियाने हा गुन्हा केलाचा पोलिसांना संशय आहे. आरोपी पाईप वरून चढून वसतिगृहात प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

SCROLL FOR NEXT