Pankaja munde  Saam tv
मुंबई/पुणे

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

Pankaja munde : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिक़ॉप्टरमध्येही बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. प्रचारासाठी निघालेल्या पंकजा मुंडेंसोबत नेमकं काय घडलं? त्यांनी काय स्पष्टीकरण दिलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राजकीय सभांचा धडाका आणि हेलिकॉप्टरचं उड्डाण हे आता नेत्यांसाठी अपरिहार्य झालाय...मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनं अनेकजण सुन्न झालेत .अशातच भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आणि कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला..नेमक काय घडलं पाहूयात...

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांच्या किनगाव आणि जानवळ येथे दोन मोठ्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथून उड्डाण करण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं...त्यामुळे हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे सभांच्या वेळा पुढे ढकलल्या..

दरम्यान योगायोग म्हणजे पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी हेलिकॉप्टर प्रवासाबद्दल आई काळजी करत असल्याचं सांगितलं होतं...

दुसरीकडे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर पंकजा मुंडेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलयं..... हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच मला बिघाडाबाबत माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं...

अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रानं एका मोठ्या नेत्याला गमावलं... .सुदैवानं पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमधील बिघाड वेळीच लक्षात आल्यानं त्यांनी दुसऱ्या विमानातून सभास्थळ गाठत प्रचाराचा धडाका सुरू ठेवला. त्यामुळे 'देव पाण्यात ठेवणाऱ्या' त्या माऊलीची प्रार्थना आज फळाला आली, अशीच भावना पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र एकामागून एक दिग्गज नेत्यांच्या विमानांमध्ये होणारा हा तांत्रिक बिघाड चिंतेचा विषय ठरतोय...निवडणुकांच्या काळात नेत्यांचा प्रवास वाढतो, अशा वेळी विमानांची देखभाल आणि तपासणी योग्यरित्या का होत नाही, हा सवाल कायम आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT