कल्याण पश्चिमच्या रोनक सिटी सेक्टर ४ मध्ये १२ वर्षीय मुलाला शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. या सोसायटीमध्ये असलेल्या गार्डमध्ये मित्रांसोबत खेळत असताना लोखंडी रॉडला शॉक लागल्याने हा मुलगा जखमी झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विहान देवळे असे या मुलाचे नाव असून शॉक लागल्यानंतर सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी बिल्डरवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
रहिवाशांचा संताप पाहता 'मुलाला काही झाल्यास बिल्डरला कल्याणमध्ये फिरकू देणार नाही', असा इशारा मनसेने विकासकाला दिला आहे. रोनक बिल्डरविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास कल्याण पश्चिमेला असलेल्या रोनक सिटी सेक्टर ४ मधील गार्डनमध्ये ही धक्कादायक घटना घडली. १२ वर्षीय विहान देवळे हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी अचानक लोखंडी रॉडमधून शॉक लागून तो जखमी झाला. शॉक लागल्यामुळे विहान खाली कोसळला. सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मदतीसाठी आरडाओरडा करत विहानचे प्राण वाचवले. विहानला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर त्याला ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी पोलिस स्थानकाबाहेर मोठी गर्दी करत बिल्डरविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. बिल्डरकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दुरुस्ती किंवा उपाययोजना करण्यात येत नसून यापूर्वीही या परिसरात लहान मुलांना शॉक लागण्याच्या घटना घडल्या घडल्याचे रहिवाशांनी सांगितले. बिल्डर आणि त्यांची माणसं इमारतीचा दर महिन्याला मेंटेनन्स घेऊन सुविधाबाबत विचारणा केली असता दादागिरी करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, मनसेने या घटनेची दखल घेत नागरिकांना योग्य सुविधा मिळवून देण्यासाठीही पाठिंबा दर्शवला. या मुलाला काही झालं तर बिल्डरला कल्याणमध्ये फिरकू देणार नाही असा संतप्त इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी कल्याण पोलिस ठाण्यात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.