Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार
विवाहित महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवून वारंवार अत्याचार.
आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली.
संबंधित युवकाविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
शहरातील कॅफेंमधील अश्लील चाळ्यांवर याआधीही आमदारांनी तक्रार केली होती.
अकोल्यातील एका कॅफेत ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अकोल्यातल्या जीएमडी मार्केट मध्ये असलेल्या एका कॅफेत हा प्रकार घडला आहे. एका ३३ वर्षीय विवाहित महिलेवर २९ वर्षीय तरुणाने लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या शुभम टाले याच्याविरुद्ध विविध कलमान्वये सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची अकोल्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
नेमकं काय घडलं ?
एका ३३ वर्ष विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पती सतत दारू प्यायचा अन मारहाण करायचा. त्यामुळे ही महिला वेगळी राहत होती. यावेळी त्या महिलेची नराधम शुभम टालेसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. पुढं त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली. याच दरम्यान, शुभने तिच्यासोबत लग्न करतो म्हणून पतीसोबत विभक्त होण्यास सांगितले. काही दिवसांनंतर शुभम या विवाहित महिलेला घेऊन अकोल्यातल्या एका कॅफेत घेऊन गेला, आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
याच ठिकाणी तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाला नकार दिला, अन् शिवीगाळ करून तिला मारहाण केली. त्यामुळे लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध केले. संबंधित महिलेने अकोल्यातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून. आरोपी शुभम गजानन टाले याच्याविरुद्ध ६४ ,६४(२) (m) BNS या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
आमदार नितीन देशमुख कॅफे विरोधात आक्रमक
अकोला शहरात अनेक कॅफेंमध्ये मुला मुलींना बसण्यासाठी अतिरिक्त सोय सुविधा पुरवल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तर काही कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लील चाळे चालत आहे, अशा तक्रारी आमदार नितीन देशमुख यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी अकोल्यातील जवाहर नगर भागातील कॅफेंवर अचानक भेट देत तपासणी केली होती. या दरम्यान अल्पवयीन तरुणाई अश्लील चाळे करत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत भयंकर अन् खाली मान घालायला लावणारा होता. या संदर्भात देशमुखांनी महापालिका आयुक्त तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनाही कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, तरीही अनेक कॅफेमध्ये सर्रासपणे गैरप्रकार सुरू असल्याच पुन्हा एकदा उघड झालं.
कॅफेमध्ये मुलामुलींना अशी असते व्यवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात अनेक कॅफेमध्ये तरुणाईला बसण्यासाठी प्रायव्हेट खोलीची व्यवस्था दिली जाते. त्यात त्यांचे शोषण केले जाते. आमदार देशमुखांनी या विरोधात आवाज उचलला तरी संबंधित कॅफे चालकाने जे करायचं, ते सुरुच ठेवलं. विशेष म्हणजे कॅफे चालक हे ग्राहकांकडून २ ते ३ हजार रुपये अतिरिक्त घेतात आणि स्पेशल कॅबिन ज्याला पडदे लावलेले असतात ते पुरवतात .
त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नसतात, अशा केबिनला तरुणाई मोठ्या प्रमाणात वापरतात. दरम्यान, या प्रकारला आळा घालण्यासाठी अकोल्यातल्या काही महिलांनी स्थानिक आमदारांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र अद्यापही त्यावर काही तोडगा निघाला नाही. दरम्यान या सर्व घडलेल्या प्रकारानंतर आता अकोला महापालिका, पोलीस प्रशासन, संबंधित विभाग काय भूमिका घेते? हे पाहणं तितकच महत्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.