Mumbai Crime Saam TV News
मुंबई/पुणे

Mumbai Crime: कॅबमध्ये दोघे शिरले अन् हात पिळून विनयभंग; मुंबईत महिला पायलटसोबत रात्री आक्रित घडलं

Woman Pilot Assaulted in Cab: घाटकोपरमध्ये २८ वर्षीय महिला पायलटचा कॅबमधील प्रवासादरम्यान विनयभंग. चालकाला अटक, दोन आरोपी फरार. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Bhagyashree Kamble

कॅबमधील प्रवासादरम्यान महिला पायलटवर विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतून उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेनं थेट पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकरण सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी कॅब चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी कॅब चालकाला अटक केली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

घटनेच्या दिवशी २८ वर्षीय पीडित महिलेनं मुंबईच्या काळाघोडा येथून कॅब बुक केली होती. रात्रीच्या सुमारास ती प्रवास करीत होती. चालकाने निश्चित रूट टाळून गाडी दुसऱ्याच मार्गावर वळवली. नंतर कॅबमध्ये त्याने दोन जणांना बसवलं. पुढे कार गेल्यावर त्यापैकी एका व्यक्तीने महिलेचा हात पिळला, तर दुसऱ्याने तिचा विनयभंग केला.

दरम्यान, पोलिसांच्या नाकाबंदीमुळे दोन्ही आरोपी कारमधून उतरले. त्यानंतर चालकाने महिलेला तिच्या घरी सोडलं. महिलेने कॅब चालकाला जाब विचारत त्या दोन व्यक्तीबद्दल विचारले असता, त्याने काहीच उत्तर दिले नाही आणि तो निघून गेला. महिलेने या घटनेबाबत घरी सांगितल्यानंतर ती घाटकोपर पोलीस ठाण्यात गेली आणि आरोपींवरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाला अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.

घाटकोपरच्या ऑक्रिड टॉवर नंबर ६मधील चौथ्या मजल्यावर भीषण आग

मुंबईच्या घाटकोपरमधील ऑक्रिड परिसरातील टॉवरमध्ये आगीची घटना घडली आहे. टॉवर क्रमांक ६ मधील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, मुंबई पोलीस ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचाही शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सीडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

Silver Rate Prediction: सोन्यापेक्षा चांदीनं केलं मालामाल! १० महिन्यात ₹९०,००० वाढ, आता खरेदी करणे योग्य का?

SCROLL FOR NEXT