Pimpari Chinchwad Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांना वैतागली, बायकोनं त्याच्या गर्लफ्रेंडला केलं किडनॅप, जन्माची अद्दल घडवली!

Pimpari Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलेने नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. तिने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं अपरहण करून तिला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं अपरहण करून तिला धूधू धुतलं. ही घटना पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये घडली. हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतील विप्रो सर्कल या ठिकाणी महिलेने आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचे कारमधून अपरहण केलं. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेऊन चोपलं. नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं अपहरण करण्यासाठी या महिलेला तिच्या आई आणि भावाने मदत केली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून एका महिलेने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं कारमधून अपरहण केलं. त्यानंतर तिला बेदम मारहाण केली. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील विप्रो सर्कल या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. विवाहित महिलेने आपला भाऊ आणि आईच्या मदतीने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं अपरहण केलं आणि तिला चोप देत जन्माची अद्दल घडवली.

रस्त्यावरून जाणाऱ्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला या महिलेने कारमध्ये कोंबलं. त्यानंतर या महिलेने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर तिने तिला वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोडून दिलं. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी महिला आणि अपहरण करण्यासाठी मदत करणाऱ्या तिचा भाऊ आणि आईविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT