Mumbai Crime News Saam tv News
मुंबई/पुणे

Mumbai: कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं; मुंबईत माणुसकीचा अंत

Elderly Woman Found Injured in Garbage: मुंबईत नातवाने त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त आजीला कचऱ्यात फेकले. आरे कॉलनीत मरणासन्न अवस्थेत सापडलेल्या महिलेला ८ तासांनी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bhagyashree Kamble

मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नातवाने आपल्या सख्ख्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं आहे. शनिवारी सकाळी आरे कॉलीनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका दुर्बल वृद्ध महिला आढळून आली. कचऱ्यामध्ये मरण्यासन्न अवस्थेत असलेल्या या महिलेनं नातवाने फेकून दिल्याचं सांगितलं. सध्या पोलीस वृद्ध महिलेच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा गायकवाड (वय वर्ष ६०) असे वृद्ध महिलेचं नाव आहे. वृद्ध महिला आपल्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात. त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे. आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ८:३० च्या सुमारास काहींना ही महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसली. पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, आरे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वृद्ध महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मरण्यासन्न अवस्थेत दिसली.

तिने गुलाबी रंगाचा नाईटड्रेस आणि राखाडी रंगाचा पेटीकोट परिधान केला होता. तिच्या गालावर आणि नाकावर जखमा होत्या. वृद्ध महिलेला त्वचेचा कॅन्सर असल्याकारणाने तिच्या नातवानेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची माहिती तपासातून समोर आली. पोलिसांनी तातडीने महिलेला रूग्णालयात दाखल केलं असून, सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

महिलेची प्रकृती बिघडत असताना कोणतेही रूग्णालय त्यांना दाखल करण्यास नकार देत होता. ८ तासानंतर कुपर रूग्णालयात त्यांना दाखल करून घेतलं. सध्या त्या वृद्ध महिलेवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

SCROLL FOR NEXT