Nerul murder case
Nerul murder case saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : नेरुळमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा! 25 वर्षांपूर्वी केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिली 25 लाखांची सुपारी

साम टिव्ही ब्युरो

>> सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई.

Nerul Murder Case: नवी मुंबईत 15 मार्च रोजी दिवसाढवळ्या रियल इस्टेट एजंटची गोळ्या झाडून करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असून मृत सावजीभाई पटेल यांनी आपल्या गुजरातमधील मूळ गावी 25 वर्षांपूर्वी केलेल्या एका खूनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

ही हत्या घडवून आणण्यासाठी बिहारमधील 3 जणांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार दैनंदिन रेकी करुन सावजी पटेल यांची नेरुळमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मेहेक नारिया, कौशल यादव, गौरवकुमार यादव आणि सोनुकुमार यादव या चौघाना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हत्येच्या कटात सहभागी इतर आरोपींचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी 15 मार्च रोजी नवी मुंबईतील नेरुळ भागात एक व्यवसायिक सावजी पटेल यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. अतिशय संवेदनशील प्रकरण असलेल्याने पोलिसांच्या वेगेवगळ्या पथकांनी मिळून या प्रकरणाचा कसोशीने तपास केला आणि आरोपींना अटक केली आहे. (Navi Mumbai News)

या गुन्ह्याचे मूळ गुजरातमध्ये असून जून्या वाद्यातून ही हत्या झाली अशी माहिती देखील भारंबे यांनी दिली. मृत व्यवसायिकाने 1998 मध्ये मूळ गावी केलेल्या एका हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येसाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राज्यात पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४ दिवस शिल्लक

T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT