बदलापूरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये घडली धक्कादायक घटना
मोबाईल चोरीच्या प्रयत्नातून प्रवाशाला ट्रेनमधून ढकललं
बदलापूरच्या तरुणाचा पाय थेट ट्रेनच्या चाकाखाली
तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत
मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने प्रवाशाला धक्का दिला. यात प्रवासी थेट ट्रेनच्या चाकाखाली गेला. या दुर्घटनेत प्रवाशाच्या पायाचे तुकडे झाले. तर डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
रितेश राकेश येरूणकर असे अपघात झालेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश हा बदलापूर पूर्व भागातील आनंदनगर भागात राहायला आहे. तो कामाला नवी मुंबईतील सीवुड्स दारावेमधील एका मॉलमधील कपड्याच्या दुकानात कामाला होता. ठाणे स्टेशनवर १८ जानेवारी रोजी २०२६ रोजी रात्री ११ वाजता बदलापूरला जाणारी फास्ट ट्रेन पकडली.
रेल्वेच्या माहितीनुसार, बदलापूर ट्रेन ही रात्री ११.४५ वाजता अंबरनाथ स्टेशनवर येऊ लागली. त्याचवेळी जवळ बसलेल्या तरुणाने रितेशच्या हातातून मोबाईल खेचला. रितेशने त्याला विरोध केला. त्यानंतर आरोपीने रितेशला धक्का दिला. त्यानंतर रितेश धावत्या ट्रेनमधून पडला. ट्रेनमधून पडताना त्याचा डावा पाय ट्रेनच्या चाकाखाली आला. या अपघातात रितेशच्या पायाचे तुकडे झाले.
ट्रेनच्या अपघातात रितेशच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. त्याचे डोळे सूजले आहेत. अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने त्याला उल्हासनगरमधील सेंट्रल रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मुंबईच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. रितेशची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कल्याण जीआरपीने या प्रकरणी आरोपी कैलाश बाळकृष्ण जाधव या अटक केली आहे. त्याच्या विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी लोकल ट्रेनमधील सुरक्षेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.