Indigo Flight News  Saam Tv
मुंबई/पुणे

Indigo News: इंडिगो विमानात प्राध्यापकाचं महिलेसोबत धक्कादायक कृत्य; पोलिसांकडून आरोपीला अटक

Shivani Tichkule

Indigo Flight News: दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एका महिलेचा लैंगिक छळा केल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली. प्रोफेसरवर फ्लाइट दरम्यान 24 वर्षीय डॉक्टर महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली.  (Latest Marathi News)

इंडियन (Indigo) एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हे प्रकरण इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटशी संबंधित आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रोफेसर रोहित श्रीवास्तव याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्यानंतर त्याचा जामीन देखील मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणारा रोहित श्रीवास्तव आणि डॉक्टर महिलेची सीट आजूबाजूला होती. बुधवारी (26 जुलै) दिल्लीहून पहाटे 5.30 वाजता हे विमान मुंबईकडे रवाना झाले. पण विमान मुंबईत (Mumbai) उतरण्यापूर्वीच आरोपीने महिलेसोबत अश्लील कृत्य केले.केल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. तसेच आरोपीने आपल्यला चुकीच्या हेतून स्पर्श केल्याचे देखील महिलेने म्हटलं आहे. 

ही गोष्ट महिलेच्या लक्षात येताच तिने त्या व्यक्तीस विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन्ही प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. वाद जास्तच वाढल्यावर कर्मचारी तेथे पोहोचले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, विमानाच्या लँडिंगनंतर अधिकारी या दोघांनाही सहार पोलीस ठाण्यात घेऊन गेले, जिथे आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. तसेच या मुलीचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले की, श्रीवास्तव यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ३५४ आणि ३५४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सध्या आरोपीला जामीन मिळाला आहे. पंरतु अद्याप यावर इंडिगो एअरलाईन्सकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT