धक्कादायक ! महिला पोलिस शिपाईचा सहकाऱ्यानेच केला विनयभंग
धक्कादायक ! महिला पोलिस शिपाईचा सहकाऱ्यानेच केला विनयभंग SaamTv
मुंबई/पुणे

धक्कादायक ! पोलिस महिलेचा सहकाऱ्यानेच केला विनयभंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज सावंत

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना पोलिस कशा प्रकारे धडा शिकवतात हे आपण ऐकून असाल. माञ मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात एका महिला पोलिस शिपाईचा तिच्याच सहकाऱ्यानेच पाठलाग करून व मेसेज करून तिची बदनामी करत, विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिला पोलिस शिपाईने दिलेल्या तक्रारीनुसार सहकारी पोलिस शिपायावर विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Shocking! A female police constable was molested by her colleague

हे देखील पहा -

ठाणे जिल्ह्यात राहणारी २६ वर्षीय महिला मुंबई पोलिस दलात सशस्ञ पोलिस दलात कार्यरत आहे. आरोपी पोलिसही याच महिलेसोबत कार्यरत आहे. आँक्टेंबर २०२० पासून हा पोलिस शिपाई या महिलेच्या मागावर होता. सुरवातीला महिला पोलिस शिपाईने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी शिपाईने महिला पोलिस शिपाईचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच न थांबता त्याने महिलेच्या फोन नंबरवर वारंवार मेसेज करू लागला. वेळोवेळी या महिलेने आरोपी पोलिस शिपायाला समज देऊन हे प्रकार थांबवण्याबाबत समजावले. माञ आरोपी ऐकत नव्हता.

रोजच्या या ञासाला पीडित महिला पोलिस शिपाई पूर्णतः कंटाळली होती. त्यामुळेच सुट्टी घेऊन पीडित महिला तिच्या गावी गेली असताना. नशेत धुंद या आरोपी पोलिस शिपाईने तिचे गाव गाठले. ऐवढ्यावरचं न थांबता पीडितेच्या गावी त्याने महिला पोलिस शिपाईबद्दल गोंधळ घालत नातेवाईंकामध्ये बदनामी केली.

या संपूर्ण घटनेने संतापलेल्या महिला पोलिस शिपाईने १८ जून रोजी अखेर पोलिस ठाण्यात संबधित पोलिस शिपाया विरोधात कलम ३५४,३५४ (ड), ५०० भा.द.वि कलमांसह गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT