Mira Bhayandar Crime Saam Tv
मुंबई/पुणे

लज्जास्पद! पतीविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर पोलिसानेच केला अतिप्रसंग

Mira Bhayandar Crime : पीडित महिला नवऱ्यापासून खूश नसल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला

चेतन इंगळे

मीरा भाईंदर: मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका महिलेवर पोलीस (Police) हवालदारानेच बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. पोलीस हवालदार असल्याचा फायदा घेत नवऱ्यासोबत झालेला वाद मिटवून देतो असे आश्वासन आरोपीने पीडितेला दिले. त्यानंतर धारावी मंदिर (Dharavi Mandir) परिसरात नेऊन आरोपीने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळासाहेब ढोले (वय २८) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित महिला भाईंदर पूर्व परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी पीडितेचे आपल्या पतीसोबत भांडण झाले होते. घरगुती भांडणातून पीडिता पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी पीडितेची ओळख पोलीस हवालदार बाळासाहेब ढोले याच्यासोबत झाली. बाळासाहेब याने नवऱ्यासोबत झालेला वाद मिटवून देतो असे आश्वासन पीडितेला दिले.

त्यानंतर बाळासाहेब याने पीडित महिलेला विश्वासात घेऊन भाईंदर रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. तेथून पश्चिमेला असलेल्या प्रसिद्ध धारावी मंदिर परिसरात नेऊन पीडितेची समजूत काढली. तसेच पीडित महिला नवऱ्यापासून खूश नसल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर जबदस्तीने अत्याचार केला. पोलिसानेच आपल्यावर अत्याचार केल्याने पीडित महिला प्रचंड घाबरली. त्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या घरातील सदस्यांना सांगितला.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत बाळासाहेब ढोले या पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी बाळासाहेब याच्याविरोधात नवरघर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल करत असताना संबंधित आरोपी पोलीस ठाण्यात उपस्थित होता होता. गुन्हा दाखल होताच त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT