Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेनेतील वाद शाखेच्या खोल्यांपर्यंत; २ शिंदेंच्या तर २ ठाकरें समर्थकांच्या ताब्यात

राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत.

प्रदीप भणगे

डोंबिवली : शिवसेनेच्या (Shivsena) डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळविण्यासाठी मंगळवारी शिंदे व ठाकरे समर्थक आपआपसात भिडले. या राडेबाजीनंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शिंदे व ठाकरे गटात विभाजन झाल्याचे पहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाळी नंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. तर दोन्ही गट आमची शिवसेना हिच खरी असल्याचा दावा करत आहेत. ही लढाई आता न्यायालयात देखील आहे.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता डोंबिवलीमधील (Dombivli) मंगळवारच्या या राडेबाजी नंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे दोन गटांत विभाजन झाल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीमधील शिवसेना शाखेमध्ये चार खोल्या आहेत. या चारपैकी मध्यभागी असलेल्या २ खोल्यांवर आता शिंदे गटाने ताबा घेतला आहे. या दोन खोल्यांमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असून त्याचबाजूला बैठक खोली आहे.

या दोन्ही खोल्यांवर शिंदे गटाने ताबा मिळविला आहे. तर पहिल्या व शेवटच्या अशा दोन खोल्या ठाकरे समर्थकांच्या ताब्यात आहेत. दोन ते तीन समर्थक केवळ शाखांत बसलेले असून पोलीसांचा देखील खडा पहारा शाखेच्या बाहेर आहे. जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत शांततेची भूमिका सध्या दोन्ही गटांनी घेतल्याचे चित्र शाखेत दिसून येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT