ShivSena will not be afraid said Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde: "तपास यंत्रणांचा 'प्रेशर टेक्निकसाठी' वापर केला जातोय; शिवसेना घाबरणार नाही" - एकनाथ शिंदे

Eknath Shinde On Sanjay Raut: या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते त्यामुळे राऊतांना एकनाथ शिेदेंच्या पाठिंबा आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: "महाविकास आघाडीच सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे, केंद्रीय तपासयंत्रणेचा प्रेशर टेक्निकसाठी वापर केला जातो, शिवसेना पक्ष याला घाबरणार नाही" असं वक्तव्य केलं आहे राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Investigative mechanism are being used for pressure technique Shiv Sena will not be afraid said Eknath Shinde)

हे देखील पहा -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणांवर अनेक आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या आमदार, खासदार, मंत्री यांना हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते त्यामुळे राऊतांना एकनाथ शिेदेंच्या पाठिंबा आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांचं समर्थम करत केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका केली आहे. मंत्री एकनाथ महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. केंद्रीय तपासयंत्रणेचा प्रेशर टेक्निकसाठी वापर केला जातो शिवसेना पक्ष याला घाबरणार नाही. राऊतांच्या पत्रकार परिषदेतील अनुस्थितीबाबत ते म्हणाले की, संसदीय कामकाज समितीची महत्त्वाची बैठक होती. त्या बैठकीत चंद्रकांत पाटील नव्हते त्यामुळे त्यांना माहीत नाही, संजय राऊत यांच्यासोबत शिवसेना पक्ष आणि आम्ही आहोत.

कॉंग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतलेल्या भेटीबाबत शिंदे म्हणाले की, मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जातो. महाविकास आघाडीत कांग्रेस घटक पक्ष आहे, त्यामुळे त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे विषय मांडावा म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतील यात काही वावगं नाही.

त्याचप्रमाणे बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरु झाली, याबाबत ते म्हणाले की, लोकांचा प्रवास सागरी मार्गाने सुकर होईल. ७०० किमीचा सागरी किनारा आहे, यामुळे सागरी प्रवासाचा पर्याय आहे. पहील्या टप्प्यात भाऊचा धक्का ते नवीमुंबई हा मार्ग खुला झाला आहे. लोकांच्या सुचनेनुसार कालांतराने कामात बदल करु.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilha Parishad School : बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; शिक्षक दाम्पत्याच्या योगदानाला लोकसहभागाची साथ

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT