Prakash Ambedkar-Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena-VBA Meeting: महाविकास आघाडीसोबत लवकरच वंचित बहुजन आघाडी दिसणार, बैठकीनंतर शिवसेना नेत्याचं मोठं विधान

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्र येण्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> विश्वभूषण लिमये

मुंबई : वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत (Shivsena) दुसऱ्या टप्प्यातील चर्चा आज पार पडली. कोणालाही अंधारात ठेवून ही चर्चा चाललेली नाही. तसेच कोणाचाही वंचितला सोबत घेण्यासंदर्भात विरोध नाही. महाविकास आघाडीसोबत लवकरच वंचित बहुजन आघाडी दिसणार, असल्याचं भाष्य सुभाष देसाई यांनी केलं आहे.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्र येण्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर त्यांचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये बैठका होत आहेत. (Latest Marathi News)

पुढची वाटचाल अधिक भक्कमपणे व्हावी कुठली शंका राहू नये यासाठी या बैठका महत्त्वाच्या आहेत. चर्चांचे टप्पे महत्त्वाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी कोणाचाच विरोध नाही. मला जी माहिती आहे त्यामध्ये मी सांगू शकतो आणि चर्चेतूनच पुढे जाऊ शकतो, असं देसाई म्हणाले.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना आम्ही वंचितसोबत चर्चा करत आहोत याची कल्पना आहे. कोणालाही वंचितला सोबत घेताना अंधारात ठेवलेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये अनेक संघटना येतात आणि हा प्रवाह अधिक मोठा होत जातो. महाविकास आघाडीमध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडी सुद्धा लवकरच पाहायला मिळेल, असं देखील सुभाष देसाई यांनी म्हटलं.

सुभाष देसाई यांच्यासोबत आज येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात चर्चा झाली. याआधी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती. त्यानंतर आम्ही ही चर्चा पुढे सुरू ठेवली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जायला आम्ही तयार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जर कुठल्या नेत्यांनी आम्हाला त्याच्यासाठी बोलवलं तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, वंचितचे मुंबई अध्यक्ष अबूल हसन खान यांनी म्हटलं.

येत्या काळात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. भाजपला जर सत्तेपासून दूर ठेवायचा असेल तर आम्हाला एकत्र आले पाहिजे, असं देखील अबूल हसन खान यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: तलाठी पतीची पॅरारालीसीस झालेल्या पत्नीला जबर मारहाण

Budh Gochar 2025: सिंह राशीच्या घरात बुध ग्रहाच्या प्रवेशाने ८राशींचे वाढणार टेन्शन; नात्यात दुरावा अन् बसणार आर्थिक फटका

Lonavala Heavy Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

Monsoon Rain Update: सावधान! महाराष्ट्रासह ६ राज्यात मान्सून घेणार रौद्र रुप; सात राज्यात पावसाचा अलर्ट

Government Land Scam : सामच्या बातमीचा दणका! पुण्यात १८०० कोटींचा शासकीय जमीन घोटाळा उघडकीस, गैरव्यवहार करणाऱ्यांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT