Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे घराण्याचा 'राजकीय अस्त'? नेमकी काय आहेत कारणे? जाणून घ्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे यांनी ट्विट करून शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांची पक्ष प्रतोदपदी निवड केल्याची माहिती दिली. शिंदे यांच्या या कृतीने थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याचं मानलं जात आहे. अशात आता ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त झाला का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावून समर्थक आमदारांसह थेट गुजरातमधील सूरत गाठले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार परत येतील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्नही झाला. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींवरून तरी लक्षात येत आहे.

शिंदे यांना पक्षाने गटनेतेपदावरून हटवल्यानंतर परतीचे दार जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात होते. त्यात आता पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे शिंदे यांनी ट्विटरवरून जाहीर केले. एकप्रकारे शिवसेनेवर शिंदे यांनी दावा करून उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त आहे का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत राजकीय विश्लेषक, पत्रकार यांनी विविध मते व्यक्त केली आहेत.

शिवसेनेवर ही वेळ का आली?

राज्यसभा निवडणुकीपासूनच या शक्यतेची कुणकुण लागली होती. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जास्त कोटा द्यायचा, शरद पवार यांनी रणनीती ठरवली होती. पण या रणनीतीला सेनेतील नेत्यांनी विरोध केला. परिणामी संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. उद्धव ठाकरे साधे नेते आहेत, त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा फार अनुभव नाही. शरद पवार यांनी जर बंडखोरीचा निरोप पाठवला होता, तर ठाकरेंनी सावध राहायला हवे होते, पण तसे झाले नाही, हे गंभीर आहे. या संदर्भात आता खरे सत्य बाहेर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हातून ही चूक कधीच झाली नसती, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.

शिवसैनिकांची खदखद समजली नाही?

एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत आहे, हा त्यांचा दावा महत्वाचा आहे. महाविकास आघाडीच्या तडजोडीत हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला केला गेला. आता मुंबई महापालिका निवडणुकीत मत मागायला जात असताना, त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शिवसैनिकांची अनेकदा कामे केली नाहीत, म्हणून शिवसेना नेत्यांनी तक्रार केली होती. खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदेचा हा मुद्दाही महत्वाचा आहे, असे मत श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केले.

राजकीय घसरण किंवा सामर्थ्याला प्रश्नचिन्ह

नारायण राणे, राज ठाकरे यांच्यापासून खदखदीला सुरूवात झाली होती. उद्धव ठाकरेंनंतर कोण? जर आदित्य ठाकरे यांचे नाव येत असेल तर काम केलेल्या शिवसैनिकांची फरफट होत आहे, अस चित्रं समोर आले आहे. यामुळे शिवसेना संपेल, असं काही होणार नाही. ठराविक सल्लागारांमुळे लोकांना टाळले जाते, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. या बंडामुळे राजकीय घसरण किंवा सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक मकरंद मुळ्ये यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Today's Marathi News Live : जळगावमध्ये ५ अपक्ष उमेदनवारांची निवडणुकीतून माघार

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

Mumbai University Exams | मुंबई विद्यापीठ, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल!

SCROLL FOR NEXT