नवी मुंबईत बदलाचे वारे ? शिवसैनिकांचे एकनाथ शिंदेंविरोधातील मूक आंदोलन अचानक स्थगित

एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गणेश नाईकांची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांची देखील गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Ekanath shinde
Ekanath shinde Saam Tv

सिद्धार्थ म्हात्रे

नवी मुंबई : एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नाराज आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने पक्ष अडचणीत आला आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांमुळे राज्यात सत्तापालट होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे नवी मुंबईच्या शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गणेश नाईकांची (Ganesh Naik) साथ सोडून शिवसेनेत (Shivsena) आलेल्या नगरसेवकांची देखील गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Politics News In Marathi )

Ekanath shinde
व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेची अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे पडसाद काल पनवेलमध्येही उमटले होते. पनवेल शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात शिवसैनिक एकत्र जमा होत एकनाथ शिंदे व नाराज आमदारांच्या बंडाचा निषेध व्यक्त केला. तर काल शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोला देखील काळे फासले. तर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे नवी मुंबईच्या शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. काल नवी मुंबईच्या शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात असंतोष होता. त्यासाठी नवी मुंबई शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे विरोधात होणार मूक आंदोलन आयोजित केलं होतं.

मात्र, हेच मूक आंदोलन अचानक स्थगित करण्यात आलं आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदेंविरोधात उघड नाराजी दाखवण्यास शिवसैनिकांनी नकार दर्शवला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गणेश नाईकांची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांची देखील गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिक वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे समजते आहे.

Ekanath shinde
अहो, शिंदे दादा, परत या ना!; उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर

शिवसेनेचा बंडखोरांना इशारा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच, शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई अटळ असा इशारा या आमदारांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक शिवसेनेकडून संबधित आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com