अहो, शिंदे दादा, परत या ना!; उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर

राज्यात राजकीय वादळ उठले असले तरी शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
Shivsainik supports Uddhav Thackeray
Shivsainik supports Uddhav ThackeraySaam TV
Published On

सांगली : राज्यात राजकीय वादळ उठले असले तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना साद दादा परत या अशी साद घातली आहे.

सांगलीच्या (Sangli) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

हे देखील पाहा -

तसंच कोणतीही बिकट परिस्थिती आली तरीही शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने या आव्हानाला सामोरे जाऊ. शिवसेनेचे आमदार (MLA) कुठेही जाणार नाहीत. आमचे आमदार परत येतील, बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती.

शिवसेनेला त्रास देणारे कोण आहेत त्याची जाणीव असलेल्या नेत्यांनी योग्य भूमिका घ्यावी उध्दवजी योग्य तोडगा काढतील असे उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी शंभूराज काटकर यांच्यासह सांगली शहर प्रमुख महिंद्र चंडाळे, मयूर घोडके महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com