Saamana Editorial on Droupadi Murmu Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena News : राष्ट्रपतींच्या दुटप्पी भूमिकेने देश हताश आणि भयग्रस्त झालाय; शिवसेना ठाकरे गटाची जहरी टीका

Saamana Editorial on Droupadi Murmu : महिला अत्याचारावर बोलताना “बस आता खूप झालं. मी पण निराश आणि भयभीत आहे", असं राष्ट्रपती द्रोपती मुर्मू म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली.

Satish Daud

गेल्या काही दिवसांपासून देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि बदलापूर येथील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनांवर राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संताप व्यक्त केला. “बस आता खूप झालं. मी पण निराश आणि भयभीत आहे", असं राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली.

"कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांवर खुनी हल्ले केले. भाजपला त्या अभागी महिला डॉक्टरवरील बलात्काराचा निषेध करायचा आहे की यानिमित्ताने ममता बॅनर्जी यांचा राजकीय हिशेब चुकता करायचा आहे? राष्ट्रपतींनी आता प. बंगालातील त्या दुर्घटनेवर चिंता व्यक्त केली. हे भाजपधार्जिणे राजकारण आहे", अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

"मणिपुरात गेल्या दोन वर्षांत झालेल्या हिंसाचाराचा सर्वात जास्त फटका तेथील महिलांना बसला. महिलांची नग्न धिंड काढली गेली. महिलांवर बलात्कार, खुनी हल्ले झाले. भररस्त्यात उभे करून महिलांची विटंबना करण्यात आली. त्यांच्या हत्या केल्या गेल्या. खरे तर ‘‘आता पुरे!’’ या भावना राष्ट्रपतींनी त्या वेळी व्यक्त करायला हव्या होत्या", असं सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.

"बदलापुरातील अल्पवयीन मुलींवर शाळेतच अत्याचार झाले. लोक रस्त्यावर उतरले, पण भाजप-मिंध्यांचे शासन बुळचटांप्रमाणे पाहत राहिले. राष्ट्रपतींनी तेव्हा तत्काळ आपल्या संवेदना व्यक्त करायला कुणाची हरकत होती? पण प. बंगालच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनास स्त्री अत्याचारांची आठवण झाली. मणिपूरच्या महिलांचा आणि बदलापूरच्या चिमुरडय़ांचा तर विसरच पडला", अशी जहरी टीकाही सामनातून करण्यात आली.

"देशभरात महिलांवरील अत्याचारांनी उच्चांक गाठला आहे, पण सरकारचे ‘लक्ष्य’ प. बंगाल सरकार असल्याने राष्ट्रपती भवनाने प. बंगालातील एका घटनेवर चिंता व्यक्त केली. हे प्रकरण वाटते तितके साधे दिसत नाही. कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचारांचे भांडवल करून प. बंगालात राष्ट्रपती राजवट तर लावली जाणार नाही ना? अशी भीती आम्हाला वाटते. राष्ट्रपतींनी प. बंगालातील घटनेवर व्यक्त केलेली चिंता हा त्याच योजनेचा एक भाग दिसतो", असा आरोपही सामना अग्रलेखातून करण्यात आला.

"प. बंगालातील अत्याचारग्रस्त आपल्या मुलीच आहेत, मग मणिपूरच्या अत्याचारग्रस्त महिला तसेच बदलापूरमधील अत्याचारपीडित चिमुरड्या राष्ट्रपतींच्या कोणीच लागत नाहीत का? हा साधा प्रश्न आहे. बलात्कारासारख्या घटनांनी राष्ट्रपती हताश, भयग्रस्त झाल्या, पण राष्ट्रपतींच्या दुटप्पी भूमिकेने देश हताश, निराश आणि भयग्रस्त झाला आहे", अशी जहरी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

SCROLL FOR NEXT