Mahim Assembly Constituency Saam tv
मुंबई/पुणे

Mahim : हायव्होल्टेज 'राज'कारण! आदित्यंविरोधात मनसेने दिला उमेदवार, दुसऱ्या दिवशीच उद्धव ठाकरेंनीही अमित ठाकरेंविरोधात उतरवला शिलेदार

Mahim Assembly Constituency : माहिमध्ये हायव्होल्टेज राजकारण पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे. दुसऱ्या दिवशीच उद्धव ठाकरेंनीही अमित ठाकरेंविरोधात शिलेदार उतरवला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघात शिलेदार उतरवण्यास सुरुवात केली आहे. माहिममध्ये मनसेने या मतदारसंघात राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने या मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटाने देखील शिलेदार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे.

माहिम विधासभा मतदारसंघातील लढत हायव्होल्टेज लढत होणार आहे. मनसे आणि शिंदे गटाने या मतदारसंघात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दोन्ही दिग्गज उमेदवारांविरोधात ठाकरे गटाने तगडा उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महेश सावंत यांच्या एन्ट्रीने माहिम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे गटानेही महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्याने अमित ठाकरे यांच्या विरोधात दोन दिग्गज उमेदवारांचं आव्हान असणार आहे.

कोण आहेत महेश सावंत?

महेश सावंत हे १९९० पासून शिवसेनेचं काम करतात. एकेकाळी ते सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक होते. शिवसेनेचे आंदोलन, सामाजिक उपक्रमात नेहमी सहभा नोंदवला आहे. या मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. सदा सरवणकर यांनी राणेंसोबत शिवसेना सोडली, त्यावेळी महेश सावंत यांनीही राजीनामा दिला होता. २०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत महेश सावंत हे समाधान सरवणकर यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांचा २५० मतांनी पराभव केला होता.

सरवणकर शिंदे गटात गेले, त्यानंतर महेश सावंत यांना विभागप्रमुखपद देण्यात आलं. महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात मोठा वाद देखील आहे. दोघांमध्ये झालेल्या वादात गोळीबार झाला होता. त्यावेळी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती. या घटनेनंतर ठाकरेंनी मातोश्रीवर बोलून त्यांचं कौतुक केलं होतं. महेश सावंत हे शिवसेनेचे ब्रम्हास्त्र असल्याचे कौतुक ठाकरेंनी केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT