sadanand tharval  Saam TV
मुंबई/पुणे

Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ४३ वर्षे सोबत असलेल्या बड्या नेत्यानं दिला महत्वाच्या पदाचा राजीनामा

Shivsena Thackeray Group News : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News :

शिवसेना फुटीनंतर पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला. मात्र पक्षफुटीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती आजपर्यंत सुरुच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत मोठा धक्का धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. थरवळ यांच्यावर डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदानंद थरवळ हे 1980 पासून म्हणजे तब्बत 43 वर्ष शिवसेनेत कार्यरत होते. 43 वर्षात नगरसेवक, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख पदांची जबाबदारी होती. संघटना वाढीसाठी आपल्याकडून अपेक्षित काम होत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याची माहिती थरवळ यांनी दिली.  (Latest Marathi News)

जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक म्हणून काम करत राहणार, असं थरवळ यांनी स्पष्ट केलं. थरवळ यांचा राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकारणी जाहीर होत असताना थरवळ यांच्या राजीनाम्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

SCROLL FOR NEXT