Shivsena  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Thackeray vs Shinde : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने, वडाळा गणेश नगर भागातील शाखेसमोर वाद

Political News : वडाळा येथे शाखेच्या उद्घाटनावेळी दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : शिवसेनेत फूट पडून वर्ष उलटून गेलं तरी ठाकरे गट आणि शिंदे गटामधील धुसपूस अजूनही सुरुच आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांना टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

गल्लीतले कार्यकर्तेही आपआपल्या नेत्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. मात्र एकमेकांसमोर आले की त्यांच्यात राडा होतच आहे. असंच काहीसं चित्र आज वडाळ्यात पाहायला मिळालं. (Latest Marathi News)

वडाळा गणेश नगर भागात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आला. वडाळा येथे शाखेच्या उद्घाटनावेळी दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. शिवसेना शाखेसमोरच हा वाद झाला. (Political News)

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे काहीही तणावाची स्थिती तिथे निर्माण झाली होती. मात्र सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात होतं. सुदैवाने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT