Uddhav Thackeray News: 'मी बोलायला लागलो की टोमणा मारतो म्हणतात'; उद्धव ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे?

Uddhav Thackeray News: नेहमी मी बोलायला लागलो की हा टोमणा मारतो असं म्हणतात, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newssaam tv
Published On

Uddhav Thackeray News: 'आज एका वेगळ्या कार्यक्रमाला आलो आहे. नेहमी मी बोलायला लागलो की हा टोमणा मारतो असं म्हणतात, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या टीकाकार आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकाच मंचावर दिसले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित आहेत.

Uddhav Thackeray News
Yashomati Thakur News : यशोमती ठाकूर यांना अटक करा, संभाजी भिडे समर्थकांसह भाजप खासदाराची मागणी

उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. उद्धव ठाकरे म्हणाले, 'बऱ्याच दिवसांनी एका वेगळ्या कार्यक्रमाला आलो आहे. नेहमी मी बोलायला लागलो की हा टोमणा मारतो असं म्हणतात. त्यामुळे आता बोलायची पंचाईत झाली आहे'.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात ज्याचा जन्म होतो, तो जन्मजातच शिवप्रेमी असतो. शिवप्रेम आपल्या रक्तात असते. खरंच या संस्थेचं अभिनंदन करायचं आहे. अनेक वर्षांपासून ही संस्था सांभाळत आहे'.

'नेहमी म्हटलं जात इतरांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. पण भूगोलाचा आपण इतिहासासाठी कसा वापर केला हे देखील नवल आहे. महाराष्ट्रातील दुर्गांची बांधणी कशी झाली, या दुर्गाविषयी अनेक प्रश्न माझ्या मनात प्रश्न आहेत. विशेष म्हणजे राजगडाची तटबंदी बघितली. ही तटबंदी खूप व्यवस्थित आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray News
Pruthviraj Chavan Threat News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना धमकी, संभाजी भिडेंवर कारवाईची केली होती मागणी

'सध्या अनेक टॉवर मोठे झाले आहेत. त्याचप्रमाणे हे दुर्ग कसे बांधले गेले असतील. या दुर्गाविषयी बोलायला लागले तर काय होईल. हे वैभव टिकवण्याची जबाबदारी कोणावर आहे? दुर्ग हे आपलं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की, प्रतिकूल परिस्थितीत कसं पाणी पाजू शकतो. आधी आग्रा होतं, आता दिल्ली आहे.

मोडी लिपीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'मोडी लिपी हे मोडीत निघालेली लिपी आहे. आता कोणी ती सहजा लिहित नाही. मात्र, माझे आजोबा अतिशय सुंदर मोडी लिपी लिहायचे'.

Uddhav Thackeray News
Raju Patil News: कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर; रस्त्यावरील खड्ड्यांवरून आमदार राजू पाटील यांची टीका

सरकारला सांगणं अवघड, पण...'; शरद पवार स्पष्टच बोलले

दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना शरद पवार म्हणाले, 'गड किल्ल्यावरील बोलायची गरज नाही, कारण त्यावर आधीच उद्धव ठाकरे बोलले आहेत. उद्धव ठाकरे यांना याबद्दल खूप आस्था आहे, ते उत्तम फोटोग्राफर आहेत. उद्धव ठाकरे यांना दुर्ग भ्रमंतीबाबत अतिशय माहिती आहे.ऐतिहसिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत'.

'धुळ्यात जे काम सूरू आहे,ते वाढवणं गरजेचं आहे. सध्या आम्हाला या सरकारला सांगणं अवघड आहे. परंतु मी, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी जर ठरवलं तर आम्हाला काही अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com