Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Vs Shinde : ठाकरे-शिंदे गटात आणखी संघर्ष पेटणार; शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं, शिवसेना भवनाचं काय?

ठाकरे गटाकडून शिवसेना भवन जाणार का, अशी चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण हातातून निसटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून शिवसेना भवन जाणार का, अशी चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर ठाकरे गटात नाराजी पसरली आहे.

ठाकरे गटाकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ठाकरेंकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेना भवनाचं काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मुंबईच्या दादरमधील शिवसेना (Shivsena) भवन ठाकरेंकडे राहणार आहे. पण शिवसेना शाखांवरून दोन्ही गटात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना भवन हे मात्र ठाकरे गटाकडेच राहणार आहे. शिवसेना भवन ही इमारत अधिकृत शिवसेना पक्षाच्या नावावर नाही. तर शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. त्यामुळे शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करण्याची शक्यता कमी आहे.

मात्र, शिवसेना शाखांमुळे संघर्ष वाढला तर ठाकरे गटाला आणखी मोठा फटका बसू शकतो. त्याचबरोबर शिवसेनेचे सामना मुखपत्र आणि मार्मिक प्रबोधन प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित केले जाते. त्यामुळे सामना कार्यालयावरही शिंदे गट दावा करू शकत नाही. मात्र, मुंबईतील अनेक शाखांवर शिंदे गट दावा सांगण्याची शक्यता आहे.

मुंबईत शिवसेनेच्या २२७ प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक शाखा आहेत. या शाखा शिंदे गट मिळविण्याचा प्रयत्न करेल. या शाखांवरून दोन्ही गटात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने मंत्रालयाच्या बाजूला शिवालय कार्यालयावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी बहिणींची झुंबड

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT