Shahajibapu Patil : धनुष्यबाण मिळाल्यानंतर आमदार शहाजी बापूंचा जल्लोष; थेट डीजेच्या तालावर धरला ठेका, VIDEO व्हायरल

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा मोठा जल्लोष केला असून मध्यरात्री डीजेच्या तालावर चांगलाच ठेकाही धरला.
Shahajibapu Patil Dance Video
Shahajibapu Patil Dance VideoSaam TV

Shahajibapu Patil Dance Video : केंद्रीय निवडणूक आयोगाने  शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर ठाकरे गटात नाराजी पसरली असून शिंदे गटात मोठा जल्लोष केला जात आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा मोठा जल्लोष केला असून मध्यरात्री डीजेच्या तालावर चांगलाच ठेकाही धरला. (Latest Marathi News)

Shahajibapu Patil Dance Video
Ajit Pawar : धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटात जल्लोष, पण अजित पवारांनी एका वाक्यात हवाच काढली

आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झाला आहे. शिवसेनेतून उठाव केल्यानंतर आमदार शहाजी बापू गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, हा त्यांचा डायलॉग महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता. (Political News)

गुवाहाटीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर शहाजी बापूंनी आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचं म्हटलं होतं. तसंच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटालाच मिळणार असा विश्वासही व्यक्त केला होता. दरम्यान, गुरूवारी निवडणूक आयोगाचा निकाल येताच शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष साजरा केला.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉल्बीच्या तालावर चांगलाच ठेका धरला. यावेळी आनंदीत झालेल्या कार्यकर्त्यांनी शहाजी पाटील यांना उचलून त्यांची मिरवणूक काढली. या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.

“हा स्वर्गातून बाळासाहेबांनी दिलेला आशीर्वाद”

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पांडुरंगाच्या पंढरपूर नगरीत आपण असतानाच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही निवडणूक आयोगाकडून आपणास मिळाले याबाबतचा मोठा आनंद आहे, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

पांडुरंगाने आणि स्वर्गातून हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे साहेबांना आशीर्वाद दिला. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक आनंदी आहे. खरी शिवसेना शिंदे साहेबांची हे आज सत्य ठरले, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com