Ajit Pawar : धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटात जल्लोष, पण अजित पवारांनी एका वाक्यात हवाच काढली

महाराष्ट्रात जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच उभे राहतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

Ajit Pawar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने  शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar Eknath Shinde
Eknath Shinde: 'शिवसेना' अन् 'धनुष्यबाणा'ची लढाई जिंकल्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना दिला 'हा' सल्ला...

निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला, तरी माझं असणं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच उभे राहतील आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाची हवा काढली आहे. (Political News)

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

Ajit Pawar Eknath Shinde
Sharad Pawar: निवडणूक आयोगाच्या निकालाने ठाकरे गटाला फारसा फरक पडणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

शिवसेना कोणी काढली, बाळासाहेबानंतर शिवसेना कोणी पाहिली सर्वांना माहित आहे. आमदार, खासदार किंवा मंत्रीपद वाटताना सर्व निर्णय मातोश्री आणि मुंबईतील शिवसेना भवनातून घेतले जात होते. मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांना मानणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

'आधी वडील चोरले आता पक्ष'

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. आधी वडील चोरले आता पक्ष आणि चिन्ह चोरलं असंही म्हणत एकनाथ शिंदे यांनाही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. निवडणूक आयोगाला निकाल देण्याचं हेच शेण खायचं होतं तर उगाच आमचा वेळ का वाया घालवला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com