Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्रातला ठाकरे-शिंदे संघर्ष पोहचला दिल्ली हायकोर्टात; शिंदे गटानं उचललं मोठं पाऊल

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर शिवसेनेने आयोगाविरोधात थेट दिल्ली हाय कोर्टात गेली आहे.

Jagdish Patil

शिवाजी काळे -

नवी दिल्ली: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) आयोगाविरोधात थेट दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) गेली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडू न देता परस्पर आमचं चिन्ह गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी आयोगाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे.

या रिट याचिकेद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाने केवळ कागदपत्राच्या आधारे कोणत्याही गटाची बाजू ऐकू न घेता धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला असून आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देण्याची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ -

तर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकून देखील ठाकरेंच्या या याचिकेवरती आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती हायकोर्टाकडे करण्यात आली आहे. यासाठी एकनाथ शिंदेंकडून दिल्ली हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Maharashtra Live News Update: - विमानाचं लँडिंग करताना विमनाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT