Siddhivinayak Temple Trust :  Saam TV
मुंबई/पुणे

Siddhivinayak Temple Trust : सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती

Mumbai Political News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक न्यासाची जबाबदारी होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुनील काळे

Mumbai Political News :

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक न्यासाची जबाबदारी होती.

सदा सरवणकर दादर-माहिम मतदारसंघातून आमदार आहेत. शिंदे गटाच्या बंडावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच निष्ठेचं फळ त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. (Mumbai News)

शिवसेनेत सदा सरवणकर यांनी अनेक महत्त्वाच पदे भूषवली आहेत. शिंदेंसोबत आल्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली आहे. 6 नोव्हेंबरपासून पुढील 3 वर्ष त्यांचा कार्यकाळ असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदा सरवणकर यांची कारकीर्द

सदा सरवणकर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांना तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी सदा सरवणकरांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाई विजयी झाले. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत परतत 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आले.

आदेश बांदेकर सलग ६ वर्ष अध्यक्ष

शिवसेनेत सक्रीय असताना जुलै 2017 रोजी आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर न्यासावर त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. यानंतर 23 जुलै 2023 रोजी त्यांचा कार्यकाळ संपला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT